शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांचा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:41 IST

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध करत बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध करत बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना रॅक उपलब्ध करून देऊ नये म्हणून रिक्षाचालकांनी दोन दिवसांपासून बंद पाळल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात गेल्या ४०-५० वर्षांपासून रिक्षा-टॅक्सीचालक प्रवासी ने-आण करण्याचे काम करतात. त्याकरिता रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा, टॅक्सी एका रांगेत उभ्या राहण्यासाठी रॅक करून देण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी सोबत आता खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाºया ओला, उबेरसारख्या कंपन्यांची वाहने प्रवासी वाहतूक व्यवसायात उतरली आहेत. रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांनी पहिल्यापासून खासगी प्रवासी वाहनांना रेल्वेस्थानक आवारात येण्या-जाण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. गेल्या ४०-५० वर्षांपासून आम्ही प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय करतो. यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांना रेल्वेस्थानक आवारात बंदी असावी, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.  रिक्षांच्या रॅकमध्ये काही महिन्यांपूर्वी टप्प्याटप्प्याने लोखंडी बॅरिकेड्स लावल्याने रिक्षाचालकांनी त्याला तीव्र विरोध केला होता. लोखंडी बॅरिकेड्समुळे रॅकमध्ये रिक्षा कमी लागतात. त्या बॅरिकेड्सचा प्रवासी व रिक्षाचालकांनादेखील त्रास होतो असे स्पष्ट करण्यात आले होते. रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ कमर्शिअल विभागाचे अधिकारी सुनील मिश्रा, खासदार हेमंत गोडसे व रिक्षाचालकांची संयुक्त बैठक झाली होती. बैठकीत गोडसे यांनी रिक्षाचालक स्थानिक भूमिपुत्र असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी वाहतूक व्यवसाय करतात. त्यामुळे रिक्षाचालकांचा प्राधान्याने विचार करावा, असे गोडसे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी शनिवारी मध्यरात्री रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने रिक्षा रॅकमध्ये अंतराअंतरांनी लावलेले लोखंडी बॅरिकेड्स एकमेकाला जोडण्यास सुरुवात केली. मात्र, खासगी ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या वाहनांना रेल्वेस्थानकात बंदी करण्याचा निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी दोन दिवसांपासून बंद पुकारला आहे. रेल्वेस्थानक रिक्षा रॅकमध्ये सर्व रिक्षा उभ्या करून बंद पुकारण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या व लग्नसराईमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. त्यात रिक्षाचालकांच्या बंदमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक