शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

झोडगेत बंद; संपात सहभागी होण्याचा निर्णय

By admin | Updated: June 5, 2017 00:25 IST

ंमालेगाव : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा म्हणून तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास पाठिंबा म्हणून तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. शुक्रवारी चंदनपुरी शिवारात दुधाचे टॅँकर अडविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना आज जामिनावर सोडण्यात आले. दरम्यान, सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपास तालुक्यातून शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त पाठींबा दिला असून शुक्रवारी आंदोलकांनी दुधाचे टॅँकर्स अडविण्याचा प्रकार घडल्याने सतर्कता बाळगता टेहरे, मनमाड चौफुलीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी संपात सहभागी होत झोडगेत कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनी झोडगे बंदला प्रतिसाद दिला. आज रविवारी बाजार समिती बंद असल्याने बाजार समिती आवारात दिवसभर शुकशुकाट होता त्यामुळे बाजार समितीची उलाढाल बंद होती.शेतकऱ्यांची बैठकयेथील मराठा दरबार हॉलमध्ये दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यात शुक्रवारी अटक केलेल्या दहा शेतकऱ्यांना न्यायालयाने जामिनावर सोडल्याने ‘जेल का ताला दुट गया, सत्याग्रही छुट गया’ एकच नारा सातबारा कोरा, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राजेंद्र भोसले, नाना शेवाळे, अरुण पाटील, लकी गिल, मोहन शेवाळे, गोकुळ शेवाळे यांची भाषणे झाली. यावेळी दादा बच्छाव, दत्तु महाजन, विठ्ठल बागुल यांचेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रात्री १२ वाजे पासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी संपात क्रांती समिती सहभागी होत आहे. उद्या सोमवारी सकाळी १० वाजता शिवाजी पुतळ्याजवळ क्रांती समितीसह शेतकरी जमा होऊन शहरवासियांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये घेण्यात आलेल्या शेतकरी क्रांती समितीच्या बैठकीप्रसंगी जामिनावर सुटलेल्या आंदोलकांचा सत्कार करण्यात आला.