सटाणा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) तीन दिवस लागू करण्यात आलेल्या बागलाण जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सटाणा शहरासह प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. जनतेनेशंभर टक्के बंद ठेवून प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.बागलाण तालुक्याला लागून असलेल्या मालेगावात गेल्या चार-पाच दिवसातच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ कसमादे परिसरासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मालेगावात दिवसेंदिवस कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनासह जनता हादरली आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला टिळक रोड, सोनार गल्ली, पोलीस चौकी, मल्हार रोड, शिवाजी रोड, ताहाराबाद रोड परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्ते बंद केले, तसेच नववसाहत भागात स्वयंसेवकांनी काठ्या हातात घेऊन टवाळखोरांना मज्जाव केला.मालेगावकडून येणाऱ्या-जाणाºया वाहनांसाठी नवी धांद्री येथील शिव मल्हार ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर सॅनिटायझर गेट तयार करून प्रत्येक वाहन व वाहनातील व्यक्तींना सॅनिटाइज करण्यात येत आहे. हा उपक्र म संजय माळी, कमलेश पगारे, सुभाष माळी, अनिल मोरे, सुभाष चव्हाण, नागू चव्हाण यांनी स्वखर्चाने सुरू केला असून, त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. तर नामपूर, जायखेडा, ताहाराबाद येथे ग्रामपंचायतने सॅनिटायझर गेट बसविले आहे.
बागलाण तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:01 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) तीन दिवस लागू करण्यात आलेल्या बागलाण जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सटाणा शहरासह प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. जनतेने शंभर टक्के बंद ठेवून प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
बागलाण तालुक्यात कडकडीत बंद
ठळक मुद्देजनता कर्फ्यू : कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना