नाशिक : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांवर उच्च शिक्षण व तंत्रशिक्षणासंदर्भात लादलेल्या जाचक अटींच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरात यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवीच्या तब्बल दहा अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि इतर तांत्रिक कारणांचा दाखला देत यूजीसीने ही कारवाई केली असून, अशाप्रकारे मुक्त विद्यापीठात २०११ पासून सुमारे ३० ते ४० अभ्यासक्रम बंद केले असून, अशा जाचक नियम अटींमुळे दुरस्थ शिक्षण पद्धतीच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी व्यक्त केले आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला जगभरातील कॉमनवेल्थ देशांतील मुक्त व दूरशिक्षण संस्थांची सर्वोच्च संस्था कॉमनवेल्थ आॅफ लर्निंगने (कोल) ‘अवॉर्ड आॅफ इन्स्टिट्युशनल एक्सलन्स’ या पुरस्काराने सन्मानित केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.डॉ. ई. वायुनंदन म्हणाले, एकीकडे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता व आधुनिक कार्यप्रणालीसाठी गौरव होत असताना दुसरीकडे यूजीसीच्या जाचक निकषांमुळे विद्यापीठाला गेल्या ८ ते ९ वर्षांत सुमारे ३० ते ४० अभ्यासक्रम बंद करावे लागलेआहे.त्यामुळे समाजातील वंचित, उपेक्षितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ‘ज्ञानगंगा घरोघरी’ ब्रीद वाक्य घेऊन स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे उद्दिष्ट्ये साध्य होण्यात अडसर निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे, उपकुलसचिव विवेक ओक, डॉ. अंबादास मोहिते, वित्त अधिकारी एम. बी. पाटील, डॉ. उमेश राजदेरकर, डॉ. हेमंत राजगुरू, उत्तम जाधव, राजेंद्र हिरे आदी उपस्थित होते.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने २२ आणि २३ जून रोजी मुक्त विद्यापीठाला भेट देऊन येथील शिक्षण सुविधा व मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील बीएसस्सी-हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅड केटरिंग सव्हिसेस, बीएसस्सी-हॉस्पिटॅलिटी अॅड. टुरिझम स्टर्डीज, बीबीए-बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट, एमए-मराठी, एमए-हिंदी, बीएसस्सी-लॅब्रोटरी टेक्निक्स, बीएस्सी-इंटेरियर डिझाइन, बीएस्सी-फॅशन डिझाइन, बीए-योगा अॅड नेचरोपॅथी, एमएस्सी-मॅथेमॅटिक्सचा समावेश आहे.कृषी पदवीसाठी लढायूजीसीच्या नियम व अटींमुळे मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम बंद होत असताना तंत्रशिक्षणावरील निर्बंधांनुळे अडचणीत असलेल्या कृषी पदवीचा अभ्यासक्रम वाचविण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा लढा सुरूच आहे. यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी थेट केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयापर्यंत विद्यापीठाची बाजू मांडली आहे. त्यामुळे आॅक्टबरअखेपर्यंत मनुष्यबळ मंत्रालयाची तीनसदस्यीय समिती विद्यापीठाला भेट देऊन प्रत्यक्ष विद्यापीठातील पायाभूत सुविधांची पाहणी करणार असल्याची माहीती डॉ. ई. वायुनंदन यांनी दिली आहे.
मुक्त विद्यापीठातील दहा अभ्यासक्रम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:56 IST