शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

नदीकाठावरील सहाशे रोहित्र बंद

By admin | Updated: August 4, 2016 02:09 IST

सुरक्षिततेच्या उपाययोेजना : निम्मे रोहित्र सुरू; विद्युत खांबही वाकले

नाशिक : गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीकाठचा परिसर आणि रहिवासी क्षेत्रात साचलेल्या पाण्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव शहर परिसरातील ६११ रोहित्र बंद करण्यात आले होते. सकाळपासून टप्प्याटप्प्याने रोहित्र सुरू करण्यात येत असून सायंकाळपर्यंत सुमारे पाचशे रोहित्र सुरू करण्यात आल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने या पुरात नदीकाठी असलेले सुमारे ११२ रोहित्र पाण्याखाली आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ही सर्व रोहित्रे कालपासून बंद करण्यात आली होती. तसेच नाशिकरोड, भगूर, पळसे, लहवित पसरातील नदीकाठावरील सुमारे १२५ रोहित्र पाण्याखाली असल्याने ही रोहित्र देखील बंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, कॉलनी परिसरातील रहिवासी क्षेत्रात अजूनही पाणी आहे असे रोहित्र बंद करण्यात आलेली आहे. शहरातील ज्या भागात विद्युत तारा निखळल्या किंवा खांब वाकल्याने वीजप्रवाह खंडित झाला होता अशा ठिकाणचा प्रवाह पूर्ववत करण्यात आला आहे. विशेषत: गोदाकाठासह पंचवटीतील ३२९ रोहित्र प्रथम बंद करण्यात आले होते. त्यामुळे पंचवटी परिसरातील बऱ्याच परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी बंद करण्यात आलेले रोहित्र सायंकाळी पाच वाजेनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. रोहित्रात पाणी शिरल्यामुळे अनेक रोहित्रदेखील नादुरुस्त झाली. त्यामुळे युद्ध पातळीवर रोहित्र दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रोहित्राची दुरुस्ती आणि पुनर्स्थापित करण्याची कारवाई दिवसभर सुरू असली तरी काल दुपारी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सायंकाळपर्यंतही पूर्ववत झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच वीज कंपनीतील अधिकारी दूरध्वनीला दाद देत नसल्यानेही संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शहर परिसरातील ३६ केव्हीचे आठ, ११ केव्हीचे तीन, आणि एलटीचे पाच विद्युत खांब पडले आाहेत. तर सहा ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले आहेत. नाशिकरोड विभाग दोनमधील १२५ रोहित्र पाण्याखाली आल्यामुळे ही रोहित्र बंद करण्यात आली आहेत. लहवित, भगूर, सामनगाव, कोटमगाव, चाडेगाव परिसरातील रोहित्र बंद करण्यात आले आहेत. विशेषत: दारणा नदीकाठचे रोहित्र अजूनही पाण्याखालीच असल्याने सदर रोहित्र बंदच ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १३० रोहित्र सुरू करण्यात आले आहेत. नाशिकरोड परिसरातील नऊ ठिकाणी रोहित्रांमध्ये बिघाड झालेला आहे, तर परिसरात एकूण ३१० पोल पडले आहेत. (प्रतिनिधी)