शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 15:04 IST

पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देयेवला परिसर : खरीपापाठोपाठ रब्बीही वाया जाण्याची भीती धुके, दवाबरोबरच पावसाच्या शिडकाव्याने शेतकऱ्यांची धाकधूक

पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. मन्यांना तडे जात असल्याने शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसाचा धसका घेतला असून धाकधूक वाढली असून खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय ? अशी भीती सतावत आहे.दुष्काळी येवला तालुक्याला यावर्षी ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागला आहे. खरीप हंगाम चांगला आला, आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलाबाळांची लग्ने व्यवस्थित पार पाडू अशी स्वप्ने मनाशी बाळगणाºया शेतकºयांचा परतीच्या अवकाळी पावसाने घात केला , आण िशेतकर्यांची स्वप्ने स्वप्न च राहिले ऐन पिके कापणी च्या सुमारास या अवकाळी पावसाने थैमान घालून होत्या चे नव्हते केले .यात खरीप हंगामातील सोयाबीन,मका,बाजरी,पोळ कांदा, कांदा रोपे शेतातच सडून गेल्या शेतकºयांचे नुकसान झाले . या दुख: तुन सावरून शेतकरी वर्गाने उधार उसनवारी करीत रब्बी हंगामातील गहू हरभरा, रांगडा कांदा, कांदा रोपे ,उन्हाळ कांदा या पिकांची पिकांची शेतात पेरणी केली ,पिकांची वाढ होत असतानाच पुन्हा या पिकांना ढगाळ हवामान,पहाटेचे दाट धुके व दविबंदू यांची नजर लागली आहे .त्यामुळे या पिकांवर मर,करपा,मावा अळी या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, शेतकर्यांचे नकदी पीक असलेला कांदा रोगाचा सर्वाधिक बळी पडला असून त्याची संपूर्णपणे वाढ खुंटली आहे.तर कांदारोपे धुके दवाचे बळी ठरले .---------------------------भुरी,डावणी, मर रोगांचे अतिक्र मणअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसला आहे, निम्यापेक्षा जास्त बागांना या वर्षी फळधारणा न झाल्याने शेतकर्यांचे लाखो रु पयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, आॅक्टोबर महिन्यानंतर ज्या काही थोड्या फार द्राक्ष बागा सुस्थितीत होत्या. त्या बागांवरही या वातावरणाने भुरी,डावणी, मर या रोगांनी अतिक्र मण केले असे असूनही शेतकरी वर्गाने विविध प्रकारचे महागडी औषधे व बुरशीनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून वातावरणातील बदलाने तसेच दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे द्राक्ष बागांवर पुन्हा संकट कोसळले आहे. तसेच द्राक्ष मणी तडकू लागल्याने आहे.---------------------------------महागड्या औषधांची फवारणीहवामान खात्यानेही पावसाची तसेच गारिपटीचा अंदाज वर्तिवला असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली असून त्याच्या डोक्यात चिंतेचे ढग घोंगावत आहे.वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील कांदा, कांदारोप,गहू , हरभरा, द्राक्ष बागा, डाळिंब बागा यांच्यावर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहे .त्यामुळे उत्पादन खर्चात चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. असे असूनही सध्याच्या या वातावरणामुळे पिके वाया जाणार असल्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.-----------------------------------------सततच्या वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहे ,पिकांवर रोगांचा प्रदूर्भाव वाढला आहे .औषध फवारणी करून रोगांवर नियंत्रण येण्याच्या वेळेस पुन्हा हवामानातील बदलाने पहिले पाढे पंचावन्न अशी गत झाली आहे. दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा शिडकावा होत असल्याने धास्ती वाटत आहेजनार्दन भवर, द्राक्ष उत्पादक, , ठाणगाव

 

टॅग्स :Nashikनाशिक