शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे उसाला तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:42 IST

दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : उसाच्या वजनात घट होण्याची भीती

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.दिंडोरी तालुक्यात उसाच्या लागवडीखाली २६३८ हेक्टर क्षेत्र आहे. १० आॅक्टोबर २०१९ रोजी लागवड केलेला उसाचा प्लाट असून, तेरावा महिना संपत आला असतानाच उसाला तुरे निघाल्यामुळे वजनामध्ये एकरी एक टन घट येते अशी भीती शेतकरी शंकर कड यांनी व्यक्त केली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला २७५० रु पये दर नक्की केला असून, तुरे निघाल्यामुळे वजनाचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे ऊस उत्पादक सांगत आहेत. कारखान्याने तालुक्यातील उसाची तोड त्वरित सुरु करण्याची मागणीही जोर धरीत आहे.तालुक्यातील वातावरणातील बदलामुळे एका दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हवामानात सातत्याने बदल घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे. तसेच सध्या सकाळी धुके, दुपारी ऊन, व रात्री थंडी असे वातावरण तालुक्यात जवळपास सगळीकडेच आहे. यामुळे उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदाळे यांनी सांगितले. उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदाळे त्यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यात २६५ व ८६०३२ या उसाच्या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, उसलागवडीला एकरी ७० हजार रु पये खर्च येत असतो. त्यात उसाच्या बियाणासाठी पाच गुंठ्यांना ४५०० रु पये खर्च येत असल्याचे शंकर कड यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती