येवला : शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांसमोर जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी महिला खातेदारांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री जनकल्याण निधीअंतर्गत जनधन खाते असणाऱ्या महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दरमहा पाचशे रु पये जमा करण्यात येत आहेत. हे पाचशे रुपये काढण्यासाठी लाभार्थी महिलांची गर्दी होत असून, त्यात नियमित खातेदारांची भर पडत आहे. सामाजिक अंतराचे नियोजन करीत असताना बँक प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.
बॅँकांसमोर ग्राहकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:28 IST