येवला : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद महाविद्यालय बाभूळगाव यांच्या राष्टÑीय सेवा योजना एककाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत कृती पंधरवडा दैनंदिन उपक्र मासह साजरा करण्यात आला.स्वच्छता कृती पंधरवड्यात राष्टÑीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता राबविण्याचा निर्धार केला. यानिमित्ताने प्रा. समाधान झळके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पंधरवड्यादरम्यान स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसर, वर्ग, स्वच्छता गृह, मैदान व रस्त्यांची स्वच्छता केली तसेच घरोघरी जाऊन माहितीपत्रकांचे वाटप करूने ग्रामस्थांना स्वच्छता व शौचालय बांधण्याबाबत प्रोत्साहित केले. यानिमित्त गावातून स्वच्छता रॅली काढण्यात येऊन बॅनर व स्लोगनद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. मिनेश चव्हाण, डॉ. किरण पवार व डॉ. सागर इताल यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.येवला येथील आयुर्वेद महाविद्यालयातर्फे स्वच्छतेची शपथ घेताना शिक्षक व विद्यार्थी.
येवल्यात स्वच्छता कृती पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:19 IST