शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षणात नाशिक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:47 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरुवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अ‍ॅपच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेबाबतचे अभिप्राय नोंदविले आहेत. राज्यात नाशिक जिल्हा अभिप्राय नोंदणीत आघाडीवर आहे.

ठळक मुद्दे५६ हजार ग्रामस्थांचा सहभाग

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छता मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात १ आॅगस्टपासून स्वच्छता उपक्रमास सुरुवात झाली असून, या मोहिमेत थेट नागरिकांचा सहभाग मिळविण्यात नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक राखला आहे. सुमारे ५६ हजार ग्रामस्थांनी अ‍ॅपच्या माध्यमातून गावातील स्वच्छतेबाबतचे अभिप्राय नोंदविले आहेत. राज्यात नाशिक जिल्हा अभिप्राय नोंदणीत आघाडीवर आहे.केंद्राकडून आता ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यासाठी १ आॅगस्टपासून गावागावांमध्ये व्यापक स्वच्छता आणि जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील १३६८ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावागावांमध्ये स्वच्छता मिशन व्यापक करण्यात आले आहे. या मोहिमेत शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, ग्रामपंचायत कार्यालयांबरोबरच गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यबाबतही सुधारणा केली जात आहे. या ठिकाणी जाऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी आढावा घेत आहेत. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग कामाला लागले आहेत. गावागावातील स्वच्छतेचे काम कसे सुरू आहे यासाठी ग्रामीण भागातील जनतेचा यामध्ये थेट सहभाग असावा यासाठी ‘एसएसजी-१८’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामस्थ आपल्या गावाविषयीच्या स्वच्छता कामांचे अभिप्राय नोंदवित आहेत. यामध्ये रविवारपर्यंत नाशिक जिल्ह्णातील सुमारे ५६,२५२ नागरिकांनी स्वच्छतेविषयची अभिप्राय नोंदविले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्राची समिती जिल्ह्णातील स्वच्छ गावांचा दौरा करण्याची शक्यता आहे़काय आहे अ‍ॅप :१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन सर्वेक्षण उपक्रम राबविले जात आहे. गावागावांत स्वच्छतेविषयीचे काम कसे झाले याचा अभिप्राय या माध्यमातून नोंदवून कामातील वास्तविकता दर्शवू शकणार आहेत. अ‍ॅपमध्ये ग्रामस्थांना चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अभिप्राय म्हणून द्यायची आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक