मध्ये रेल्वे महाव्यवस्थापक यांचा नाशिकरोड स्थानकात दौरा प्रस्तावित असल्याने स्थानकाची रंगरंगोटीचेही काम केले जात आहे. रेल्वेस्थानकात रुळांवर प्रवासी खाद्यपदार्थ टाकतात. त्यामुळे उंदीर, घुशींची संख्या वाढली आहे. ते स्थानकातील छतांवर जाऊन विजेच्या वायरीही कुरतडतात. काही वर्षांपूर्वी त्यामुळे स्थानकात आग लागली होती. त्यामुळे वायरींची नियमित देखभाल केली जात आहे. स्वच्छता व इतर कामे युद्धपातळीवर केले जात असल्याने रेल्वेस्थानकाचे रूपडे बदलत आहे.
रेल्वे महाव्यवस्थापक दौऱ्यानिमित्ताने स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST