शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे, मराठा आंदोलकांना त्रास देऊ नका- मनोज जरांगे
2
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची तीव्रता वाढताच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबद्दल पहिला निर्णय
3
जम्मूतील रियासी, रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे हाहाकार! तीन मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता
4
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
5
Dilshan Madushanka ODI Hattrick : या पठ्ठ्यानं अखेरच्या षटकात हॅटट्रिकचा डाव साधत फिरवली मॅच
6
रितेश देशमुखचा मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाला- "मनोज जरांगेजी हे..."
7
"मराठी चित्रपटासाठी दोनदा कॉम्प्रोमाइज केलं", मेघा घाडगेचा धक्कादायक खुलासा, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
8
घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवर भिंत उभारणार का? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल
9
'त्या' व्हिडिओवर श्रीसंतची बायको संतापली; तिनं ललित मोदीसह मायकेल क्लार्कचीही काढली लाज; म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
11
उत्तर भारतात ढगफुटी अन् भूस्खलनामुळे जलसंकट, उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर हिमाचल प्रदेशात भूस्खलन; वैष्णोदेवी यात्रा स्थगित
12
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
13
भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
14
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
15
"तेव्हापासून आमच्यात…", 'सैराट' फेम आकाश ठोसरसोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेवर रिंकू राजगुरू स्पष्टच म्हणाली..
16
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
17
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
18
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
19
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
20
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार

त्र्यंबकेश्वरला गोदावरीची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:36 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेने पावसाळापूर्व गोदावरी, अहिल्या नदी साफसफाईचे काम तसेच गावातील नाले-ओहोळ सफाई मोहीम हाती घेतली असून, यावर्षी मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कामाला गती देण्यात आली आहे.यापूर्वी पावसाळापूर्व नाले सफाईचे ठेके देण्यात येत होते. पण समाधानकारक कामकाज होताना दिसून येत नव्हते. परिणामी पावसाळ्यात जोरदार पाउस आल्यास गावातील म्हातार ओहोळ, तेली गल्लीमधील निलगंगा, गोदावरी व अहिल्या आदींना पाण्याचा मोठा प्रवाह असे. नदीपात्रातील गाळ काढला जात नसल्याने संपूर्ण गावात पाणीच पाणी चोहीकडे असा प्रसंग उद्भवत असे. थेट नदीपात्रात लोकांनी केलेले अतिक्र मण, पात्रात फेकलेले भंगार सामान यामुळेही पात्र संकुचित होऊन त्यातील पाणी हे घराघरांमध्ये शिरत असे. विशेष म्हणजे तेलीगल्ली, बाजारपट्टी, गोकुळदास लेन, कुशावर्त परिसर, मेनरोड, डॉ. आंबेडकर चौक, अमृतकुंभ नगर परिषद कार्यालयासमोर आदी भागात पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असे.यावेळेस आरोग्य विभागाने नियोजन बध्द पद्धतीने संपुर्ण नाले सफाईचे काम हाती घेतले आहे. यावर्षी जेसीबी लाउन नदीपात्रात खोदाई करु न पात्र पहिल्यासारखे रु ंद करण्यात आले आहे.------------------------------------४मेनरोड कुशावर्तमार्गे नदीपात्र स्वच्छता करण्याचे काम त्र्यंबकेश्वर मंदिर, अहिल्या, गोदावरी, खुला संगमघाट, स्मशानभूमी ते पेट्रोलपंपाच्या पुढे सुरू राहणार आहे. लवकर काम सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात जाऊन मोठ्या प्रमाणात माती, भंगार माल बाहेर काढला असून, सध्या मातीचे ढीग काढण्याचे काम चालू आहे.

टॅग्स :Nashikनाशिक