शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूचे कपाट स्वच्छ करा :  महेश करंदीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:11 IST

जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठेवू नये, असे प्रतिपादन मेंदू शल्यविशारद डॉ. महेश करंदीकर यांनी केले.

सावाना ग्रंथालय सप्ताह

नाशिक : जसे आपण आपल्या घरातील कपाट व्यवस्थित अगदी मनापासून आपल्याला हवे तसे ठेवतो अन् त्याची वेळोवेळी निगा राखतो, अगदी तसेच मेंदूच्या कपाटाचीही स्वच्छता करण्यास आपण वेळ द्यायला हवा. विनाकारण वाईट विचार, दु:खद बातम्या, नकारात्मक भावनांचा कचरा मेंदूत साठवून ठेवू नये, असे प्रतिपादन मेंदू शल्यविशारद डॉ. महेश करंदीकर यांनी केले.  सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साजऱ्या केल्या जाणाºया ग्रंथालय सप्ताहामध्ये बुधवारी (दि.१९) करंदीकर यांनी ‘सुखाचा शोध : मानवी मेंदूत दडलयं काय?’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी मेंदूचे कार्य, मेंदूला होणारे आजार, मेंदू सक्षम नसल्यास ओढावणारे दुर्धर आजार, मेंदूचे आरोग्य राखण्याबाबतच्या उपाययोजना, मेंदू विकाराची लक्षणे यांची कारणमीमांसा केली. यावेळी ते म्हणाले, माणूस काम करतो हे केवळ पैसे मिळवून त्याच्या गरजा भागविण्यासाठी नव्हे तर त्या कामापासून समाधान मिळविणे हादेखील उद्देश असतो. माणसाने आपल्या मेंदूमधील बुद्धीकेंद्र आणि स्मृतीकेंद्राचा ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. बुद्धी आणि भावना यांची सांगड घातल्यास सुख-समाधानापासून तो वंचित राहू शकत नाही, असे करंदीकर यावेळी म्हणाले. मोठा मेंदू, लहान मेंदू, मज्जारज्जू असे मेंदूचे भाग आहेत. मेंदूचे कार्य हे केमिकल्सवर चालते. चांगली केमिकल्स वाढविले तर आपण आपला मेंदू निरोगी ठेवू शकतो.मेंदूचे संकेत ओळखालहानशा कारणावरून अचानक रागाचा पारा चढणे, चिडचिड होणे, संताप येणे, शरीराच्या सर्वच भागात दुखावा जाणवणे, सतत निराशावादी विचार येणे, रात्री झोप न लागणे, दिवसा झोप येणे हे मेंदूचे संकेत ओळखणे गरजेचे आहे. मेंदूचे कपाट चांगल्या विचारांनी भरून मनातील जुना मान, अपमान काढून टाकत मेंदू स्वच्छ ठेवावा, असा सल्लाही त्यांनी सोप्या भाषेत दिला. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी पौष्टीक आहार गरजेचा आहे. विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांची गरज मेंदूला असते. त्यामुळे आहारात दही, गाजर, सोयाबीन, गर असलेल्या फळांचा समावेश करावा तसेच शक्यतो उपवासापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

टॅग्स :libraryवाचनालयcultureसांस्कृतिकNashikनाशिक