शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय नृत्यकलेतून रोज मिळते सकारात्मक ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:01 IST

नाशिक : सध्या लॉकडाउनमुळे सर्वत्र सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद असले तरी घरच्याघरी नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव सुरू असून, यातून रोज एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे शिष्यांना प्रशिक्षण देता येत नसले, तरी व्हिडिओ अ‍ॅप आणि अन्य समाजमाध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे मत नाशिकमधील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनांनी व्यक्त केले.

मुकुंद बाविस्कर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या लॉकडाउनमुळे सर्वत्र सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम बंद असले तरी घरच्याघरी नियमितपणे शास्त्रीय नृत्याचा सराव सुरू असून, यातून रोज एकप्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे शिष्यांना प्रशिक्षण देता येत नसले, तरी व्हिडिओ अ‍ॅप आणि अन्य समाजमाध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे मत नाशिकमधील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगनांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आपले अनुभव मांडताना त्यांनी सांगितले की, नृत्य ही एक वैश्विक कला असून, प्रत्येक जण कमी जागेत घरच्याघरी कोणत्याही प्रकारचे नृत्य करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी नृत्य उपयुक्त ठरणारे आहे, असे अनुभवदेखील अनेकांनी मांडले. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात शास्त्रीय नृत्याविषयी गुरुंकडून आॅनलाइन मार्गदर्शन घेताना काही विद्यार्थिनींनी स्वत: नृत्य आविष्काराचे सादरीकरण करीत त्याचे व्हिडिओ तयार करून अनेकांना पाठविले. मॉर्डन बॅलेचे जनक जिन जॉर्जस नोरेन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. २९ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटच्या नृत्य समितीतर्फे भारतात इ. स. १९८२ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. यंदा लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.-------------यंदा आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करू शकत नाही. आम्ही घरी राहूनच इंटरनेटच्या माध्यमातून नृत्य कार्यक्रमाची संकल्पना सादर करणार आहोत.- रेखा नाडगौडा, ज्येष्ठ नृत्यांगना-----------------गेल्या महिन्याभरात आम्ही आणि आमच्या विद्यार्थिनींनी वैयक्तिकरीत्या भरतनाट्यम आणि धार्मिक गीतांवर आधारित व्हिडिओ बनवून अनेकांना पाठवले.- सोनाली करंदीकर,भरतनाट्यम--------------दरवर्षी आम्ही नृत्याचा कार्यक्रम आयोजित करतो. यंदा घरात राहूनच आॅनलाइन एकत्र संवाद साधणार असून, नृत्यसाधनेबद्दल चर्चा करणार आहोत.- अदिती पानसे, कथ्थक नृत्यांगना----------------------नृत्य हा एकप्रकारे सर्वांगसुंदर व परिपूर्ण व्यायामच आहे. सध्या आम्ही विद्यार्थिनींना व्हिडिओच्या माध्यमातून नृत्यातील अनेक गोष्टी सांगतो.- कीर्ती भवाळकर, कथ्थक नृत्यांगना

टॅग्स :Nashikनाशिक