शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’चा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:26 IST

वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.

नाशिक : वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात दरमहा दोन ते तीन रुग्ण आढळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये या आजाराचे वाहकांचे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.  सिकलसेल ही एक रक्तव्याधी असून, तिचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. या अनुवंशिक आजारावर औषधोपचार उपलब्ध आहे; मात्र अचूक व लवकर निदान होत नसल्यामुळे रुग्ण दगावतात. अचूक निदान न होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये ठराविक लक्षणे दिसत नाही. राज्यातील ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्णांमधील आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेलचे प्रमाण आढळून येते. आदिवासी भागात या आजाराची पाळेमुळे रुजलेली आहे. शासनस्तरावर या आजारावर मात करण्यासाठी २००९ सालापासून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी वाहक चाचणीची व्याप्ती सरकारकडून वाढविली गेली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी यांसारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती आणि व्यापक वाहक चाचणीची आवश्यकता आहे. या आजाराविषयी नागरिकांमध्ये माहिती नसल्याने अनेकदा उपचारास विलंब होतो. आजाराची फारशी लक्षणे दिसत नाही. आदिवासी भागातील निरक्षरतेमुळे सिकलसेलचा फास आदिवासी लोकसंख्येभोवती अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे...तर आई-वडिलांपासून संक्रमणरक्तामधील हिमोग्लोबीन हे मुलाला आई-वडिलांकडून प्राप्त होते. एकाच प्रकारचे हिमोग्लोबीन आई-वडिलांकडून जनुकांद्वारे मुलाला मिळाल्यास अथवा दोघांपैकी एक सिकलसेल वाहक असल्यास मुलाला या अनुवंशिक रक्तव्याधीची लागण होऊ शकते. ज्या भागात हिवताप मोठ्या प्रमाणात आढळून येतो त्या भागातील रहिवाशांमध्ये सिकलसेलचा आजार वंशजात आढळतो.तांबड्या पेशींचा मृत्यूसिकलसेल आजार खरे तर अनेक व्याधींचा समुच्चय आहे. ही व्याधी असलेल्या रुग्णांना काही त्रास होत नाही; मात्र त्यांच्या रक्तामधील तांबड्या पेशी लवकर मृत होतात. परिणामी या पेशी रक्तवाहिन्यांमधून सहज प्रवाहित होत नाही व रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन शरीराच्या एखाद्या भागात तीव्र, मध्यम किंवा अतितीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवू शकतात. या वेदनांचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न असू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्य