शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शिवालयांमध्ये ‘बम बम भोले’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:33 IST

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले.

नाशिक : श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (दि.२०) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ‘ओम नम: शिवाय’, ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी मंदिरांमध्ये अभिषेक, लघुरुद्र, महारुद्र, आरती आदींना प्राधान्य दिले. महिलांनी शिवमूठवर भर दिला. या सोमवारी तिळाची शिवमूठ असल्याने महिलांनी शिवमंदिरांमध्ये तीळ वाहिले.  सोमेश्वर, कपालेश्वर या मंदिरांबरोबरच उपनगरांमधील महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्व देवस्थानांनी सोयीसुविधा केल्या होत्या. मंदिरांबाहेर फुले, फळे, प्रसाद आदींची दुकाने गर्दीने फुलून गेली होती. अनेक भाविकांनी भल्या पहाटे त्र्यंबकेश्वरी जाऊन कुशावर्तात स्नान, त्र्यंबकराजाचे दर्शन आणि नंतर निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवत आनंद घेण्यावर भर दिला. शहरात चांगला पाऊस सुरू असल्याने गंगेला भरपूर पाणी असून भाविकांनी गोदास्नानाचाही आनंद घेतला. अनेकांचा उपवास असल्याने राजगिरा लाडू, वड्या, फळे, फराळाचे पदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली होती. काहींनी एकवेळच फराळ करून रात्रीचे जेवण टाळत उपवास केला. काहींनी निर्जळी उपवासही केला. भाविकांनी शिवमंदिरांमध्ये शिवलीलामृत, शिवमहापुराण आदींचे पठण करीत भजन, अभिषेक, रुद्राभिषेक करण्यास प्राधान्य दिले. श्रावणी सोमवारी महादेवाला बेल वाहण्याची प्रथा असल्याने बाजारात बेलाला खूप मागणी आली होती. जिल्ह्यातील दरी, मातोरी, मखमलाबाद ठिकाणांहून रविवारी रात्रीपासून शहरात मोठ्या प्रमाणात बेल दाखल झाला होता.त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जादा बसेस  श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी मोठ्या प्रमाणात बस सोडण्यात आल्या होत्या. भाविकांनी त्र्यंबकेश्वरी दर्शन, ब्रह्मगिरीला फेरी, ब्रह्मगिरी, गंगाद्वारला दर्शन करीत एकीकडे निसर्गसान्निध्याची मजा लुटत श्रावणी सोमवारचे पुण्य मिळवण्याचाही प्रयत्न केला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक