शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील आंदोलने  आता ईदगाह मैदानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:51 IST

महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर अखेर तोडगा काढण्यात आला

नाशिक : महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर अखेर तोडगा काढण्यात आला असून, नाशिक महापालिकेने शहरातील आंदोलनांसाठी ईदगाह मैदानावरील जागा देऊ केली आहे.  राजकीय पक्ष, संघटना, संस्थांच्या वतीने शासनाच्या विरोधात आंदोलने, मोर्चे, धरणे, उपोषणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर केले जात होते. मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता प्रचंड वर्दळीचा असून, दररोज होणाऱ्या आंदोलनांमुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे तसेच आंदोलकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होत होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच जिल्हा न्यायालय व समोरच्या बाजूला शाळा, महाविद्यालये असल्यामुळे नेहमी गजबजलेल्या या रस्त्यावरील आंदोलने हाताळणे पोलिसांसाठी जिकिरीचे होत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनांना परवानगी देऊ नये, असे मनोमन वाटणाºया पोलीस यंत्रणेच्या मदतीला महापालिका धावून आली. नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याचे काम सुरू केले असून, या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे एका बाजूच्या रस्त्याने दुहेरी वाहतूक केली जात असताना दुसरीकडे विविध राजकीय पक्ष, संघटना व संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलनासाठी जागा व परवानगी मिळण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी समितीने विनंती अर्ज केला आहे. परंतु जागा नसल्याचे कारण देत या आंदोलनाला परवानगी दिली जात नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिकेला पत्र देऊन आंदोलनकर्त्यांना पर्यायी जागा देण्याची सूचना केली होती.  यासंदर्भात नाशिक महापालिकेने गोल्फ क्लब मैदान (ईदगाह मैदान) येथील मोकळी जागा निश्चित केली आहे. आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने ईदगाह मैदानावरील जागेवर सीमांकन करण्यात आले असून, यापुढे शहरातील सर्व आंदोलने याच मैदानावर केली जाणार आहेत. त्याशिवाय अन्य ठिकाणच्या आंदोलनाला पोलीस परवानगी देणार नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका