येवला : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून फरार असणार्?या सराईत गुन्हेगारास पकण्यास शहर पोलिसांना यश आले आहे.24 मार्च 2017 रोजी सोमनाथ उर्फ सुनील पांडूरंग अिहरे रा. गुजरखेडे शिवार ता. येवला, बिस्किट्या बलाड्या भोसले (45) रा. उंदीरवाडी ता. येवला व अन्य एकाने मिथुनकुमार सिताराम यादव (24) रा. कुसाहान ता. जयनगर जि. कोडांरमा (झारखंड) यास तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात सोने देण्याच्या बहाण्याने बोलवून खोटे सोने देवून 3 लाख रूपयांना फसवले होते. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल होवून सोमनाथ उर्फ सुनील पांडूरंग अिहरे यास अटक करण्यात आली होती तर बिस्किट्या बलाड्या भोसले हा फरार झालेला होता. तो रात्री घरी येतो व दिवस उजाडताच निघून जातो अशी माहिती मिळाली होती. बिस्किट्याचा फोटो पोलिसांनी उपलब्ध केला होता. तर गुप्त बातमी समजल्याने पोलिस नाईक बी. बी. कांदळकर, श्याम जाधव यांनी बिस्किट्याला फोटोवरून ओळखले. त्यास बोलण्यात गुंतवून ठेवत पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना खबर दिली. कोळी सहकार्?यांसह गावात दाखल झाले व बिस्किट्या बलाड्या भोसले यास ताब्यात घेतले.दरम्यान, बिस्किट्या बलाड्या भोसले यास येवला न्यायालया पुढे हजर केले असता न्यायालयाने गुरूवार, (दि.15) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या प्रकरणी अधिक तापस पोलिस नाईक कांदळकर हे करत आहेत. सराईत गुन्हेगार असणार्?या बिस्किट्याकडून दरोडा, जबरी चोरी, लुट, फसवणूक आदी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक कोळी यांनी व्यक्त केली आहे.
फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:43 IST
येवला : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून फरार असणार्?या सराईत गुन्हेगारास पकण्यास शहर पोलिसांना यश आले आहे.
फरार सराईत गुन्हेगारास पकडण्यात शहर पोलिसांना यश
ठळक मुद्देया प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल