शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नव्याने देणार ठेका : शहर पोलीस पुन्हा राबविणार ‘टोइंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 17:00 IST

यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

ठळक मुद्देबेशिस्त पार्किंगमध्ये वाढवाहतूक शाखेची वाढली डोकेदुखीतीन महिन्यांचा असेल नवीन ठेका

नाशिक : शहर व परिसरात रस्त्यांच्याकडेला रहदारीला अडथळा होईल, अशा पध्दतीने बेशिस्तरित्या वाहने उभी करणाऱ्यांना पुन्हा ‘टोइंग’चा दणका देण्याची तयारी शहर पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे. यासाठी नव्याने निविदा काढून विविध अटी-शर्थींच्याअधिन राहून ‘नो पार्किंग झोन’मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्यात येणार आहे.शहरात यापुर्वीही पोलीस आयुक्तालयाकडून टोइंगची कारवाई करण्यात येत होती. मात्र ठेकेदाराकडून नेमलेल्या वाहनांवरील कामगारांचे असभ्य व उध्दट वर्तन आणि अरेरावीमुळे पोलिसांचीही प्रतिमा मलीन होण्यास सुरूवात झाली. शहरातून टोइंगविरोधात तक्रारी वाढल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे अखेर पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये टोइंगची कारवाई थांबविण्यात आली आणि ठेका तत्काळ रद्द केला गेला. जानेवारीअखेर रद्द करण्यात आलेल्या या ठेक्यामुळे नाशिककरांना दिलासा जरी मिळाला असला तरी काही नियमबाह्य वागणाºया नागरिकांकडून त्याचा गैरफायदा घेत वाहतूकीला अडथळा निर्माण होईल या पद्धतीने सर्रासपणे वाहने उभी केली जाऊ लागली. यामुळे पुन्हा शहर वाहतुक पोलिसांची डोके दुखी वाढली. सध्या मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे संक्रमण सुरू असल्यामुळे लॉकडाऊनची प्रक्रिया राबविली जात आहेत. तसेच जमावबंदी, संचारबंदी कायद्याचीही पोलिसांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे; मात्र तरीही सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान, शहरातील वर्दळीच्या भागात तसचे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येते. विविध रस्त्यांच्याकडेला दुतर्फा जागा मिळेत तेथे अगदी बेशिस्तपणे वाहने उभी केली जाऊ लागल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण तर मिळतेच मात्र अशावेळी वाहनचालकांकडून विनाकारण हॉर्न वाजविण्यावर भर दिला जातो आणि ध्वनीप्रदूषणातही भर पडते.

 ही प्रक्रिया साधारणत: महिनाभर चालणार आहे, यानंतर प्रत्यक्षात टोइंग व्हॅन रस्त्यांवर दिसतील; मात्र यापुर्वी ज्या कारणांमुळे टोइंगचा ठेका वादग्रस्त ठरला त्या कारणांवर काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? टोइंगचा ठेका चालविणारी कंपनी याकडे कसे लक्ष देणार? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtraffic policeवाहतूक पोलीस