शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

शहरात जनजीवन सुरळीत

By admin | Updated: October 11, 2016 01:23 IST

धाकधूक कायम : दसरा सण असल्याने बाजारपेठ खुली

नाशिक : रविवारी दिवसभर चाललेल्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सोमवारी पूर्वपदावर आले. रस्ता वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच व्यापार, व्यावसायिक प्रतिष्ठाने नियमितपणे खुले झाली. मंगळवारी दसरा सण असल्याकारणाने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर पसरलेल्या विविध अफवा व त्यानंतर रात्रीपासून सुरू झालेले आंदोलन रविवारी दिवसभर कायम राहिले. संतप्त जमावाने शहराच्या विविध भागात रास्ता रोको आंदोलने केली, तर त्यावर प्रतिक्रिया म्हणून रात्री उशिरा महात्मानगर, कॉलेजरोड आदि भागामध्ये दगडफेकीच्या घटना घडून वाहनांची नासधूस करण्यात आली. परिणामी शहरातील तणाव निवळण्याऐवजी त्यात वाढच झाली. पोलिसांनी रात्री उशिरा समाजकंटकांची धरपकड करण्यास सुरुवात करतानाच, दोन्ही बाजूंनी शांतता व सलोखा राखण्यासाठी बैठका घेऊन वातावरण निवळण्यास मदत केली. परंतु तरीही शहरवासीयांमध्ये सोमवारबाबत धाकधूक होती. शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे कारण देत अगोदरच सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक निर्धोक होते. मात्र व्यापार, बाजारपेठ सुरू होण्याविषयी साशंकता कायम असल्याने सकाळी नऊ वाजता व्यावसायिकांनी वातावरणाचा अंदाज घेऊनच हळूहळू दुकाने उघडण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, पोलिसांची सशस्त्र गस्त कायम असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. शहरातील रिक्षा व शहर बसची वाहतूकही टप्पाटप्प्याने सुरू असल्यामुळे नोकरदार, कामगारांना इच्छितस्थळ गाठणे सोयिस्कर झाले. बॅँका, खासगी कार्यालये सुरू झाले, शिवाय उद्या मंगळवारी दसरा असल्याकारणाने सराफ व कपडा मार्केेटदेखील खुले करण्यात आले.