शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

शहर तापले : नाशिककर घामाघुम; उन्हाचा वाढला चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 18:15 IST

‘ऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला आहे’ अशी चर्चा ऐकू येत आहे. यामुळे नागरिकांना उष्ण वातावरणाची सवय होता होता पुढील आठवडा तरी लागेल, यात शंका नाही.

ठळक मुद्देऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला हंगामी विक्रेते रस्त्यांवर

नाशिक : शहराच्या कमाल तापमानात आठवडाभरापासून वाढ झाली असून, किमान तापमानही वाढले आहे. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढला असून, नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गुरूवारी (दि.१९) कमाल तापमानाचा पारा ३५.८ अंशांपर्यंत पोहचल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली.आठवडाभरापूर्वी शहराचे वातावरण पूर्णत: थंड होते. नाशिककरांना कडाक्याची थंडी जाणवत होती; मात्र या पाच दिवसांपासून वातावरण बदलले असून प्रखर ऊन पडू लागले आहे. यामुळे वातावरणात उष्मा वाढला असून, उन्हाची तीव्रताही भासू लागली आहे. डिसेंबरपासून थंडीने गारठून गेलेल्या नाशिककरांना फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यातील उन्हाची तीव्रताही असह्य वाटत आहे.‘ऊन वाढले असून आता चटका चांगलाच बसू लागला आहे’ अशी चर्चा ऐकू येत आहे. यामुळे नागरिकांना उष्ण वातावरणाची सवय होता होता पुढील आठवडा तरी लागेल, यात शंका नाही. कारण पुढे मार्च ते मे महिन्यापर्यंत उन्हाची तीव्रता अधिकाधिक वाढलेली असेल. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्रतेचा सामना करण्याची मानसिक तयारी करून ठेवावी लागणार आहे.

दरम्यान, सलग तीन महिन्यांपासून थंड वातावरणाची नागरिकांना सवय झाली होती, यामुळे नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेला कंटाळून तत्काळ थंड खाद्यपदार्थ, शीतपयेय, बर्फाचे पदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. थंड पदार्थ हे शरीराला हानीकारक ठरू शकतात. कारण हळूहळू वातावरण बदलू लागल्यामुळे शरीराला उष्णतेची सवय होऊ द्यावी, त्यानंतर थंड पदार्थांकडे वळावे, जेणेकरून आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. अन्यथा सर्दी, खोकला, घशाची खवखव, ताप यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.--हंगामी विक्रेते रस्त्यांवरउन्हाची तीव्रता वाढताच शहर व परिसरातील रस्त्यांवर हंगामी विक्रेतेही नजरेस पडू लागले आहे. उसाच्या रसाचे गुºहाळ, संत्रा, मोसंबी, अननसचे रसव्रिकी करणारे हातगाडीचालक ठिकठिकाणी दिसू लागले आहे. यासोबतच लिंबू सरबत विक्रेत्यांनीही दुकाने थाटली आहेत. तसेच काही भागांत ताक, लस्सी विक्रेत्यांनीही व्यवसाय सुरू केल्याचे चित्र आहे. तसेच यासोबतच स्कार्फ, उन्हाळी टोप्या, सनकोट, सनग्लास आदी वस्तूंचीही विक्री केली जात आहे.

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान