नाशिक : केंद्र सरकारकडून लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात शहरासाठी पुरेसा साठाच उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी रविवारी (दि.२५) रात्री प्राप्त झालेल्या तीस हजार लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी (दि. ३०) शहरातील पुन्हा लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्ह्याला गेल्या रविवारी (दि.२५) एकूण ७८ हजार लसींचे डोस मिळाले होते. त्यातील तीस हजार डोस नाशिक महापालिकेला मिळाले; परंतु सोमवारी दुपारपर्यंत त्याचे वितरण सुरू असल्याने अनेकांना त्या दिवशी डोस मिळाला नाही. मंगळवारपासून ते गुरुवार असे अवघे तीन दिवस लसीकरण करण्यात आले; परंतु आता लसींचे डोस संपल्याने शुक्रवारी (दि.३०) लसीकरण होण्याची शक्यता खूपच धूसर आहे. विशेष म्हणजे यंदा ७८ पैकी सुमारे ७५ हजार कोविशिल्ड तर उर्वरित म्हणजे अवघे तीन हजार कोवॅक्सिनचे डोस होते. त्यामुळे अडचण झाली. कोविक्सिनचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव करावी लागली तर दुसरीकडे कोविशिल्ड देतानाही दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण झाली. आता शुक्रवारपासून लसीकरण होणार किंवा नाही याबाबत साशंकता आहे.
शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 01:03 IST
नाशिक : केंद्र सरकारकडून लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले असताना प्रत्यक्षात शहरासाठी पुरेसा साठाच उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी रविवारी (दि.२५) रात्री प्राप्त झालेल्या तीस हजार लसींचे डोस संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता शुक्रवारी (दि. ३०) शहरातील पुन्हा लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे.
शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट
ठळक मुद्देतीस हजार डोस नाशिक महापालिकेला मिळाले