शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शहराला ८० दिवस पुरेल इतके मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:55 IST

नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने मिळवलेल्या आरक्षणातून अत्यंत जपून पाणीपुरवठा केला, तसेच मुकणे योजना अलीकडेच सुरू होत असल्याने किंबहुना ती चाचणी अवस्थेतच बघितली जात असल्याने त्याचा शहराला फायदा होणार आहे.

नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने मिळवलेल्या आरक्षणातून अत्यंत जपून पाणीपुरवठा केला, तसेच मुकणे योजना अलीकडेच सुरू होत असल्याने किंबहुना ती चाचणी अवस्थेतच बघितली जात असल्याने त्याचा शहराला फायदा होणार आहे. गंगापूर, दारणा आणि मुकणे या तीन धरणांतून शहरासाठी अजूनही दीड हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. पाऊस वेळेत न पडल्यास किंवा अपुरा पाऊस झाल्यास मात्र महापालिकेवर जलसंकट येण्याची शक्यता आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात यंदा पुरेसा साठा आहे. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या बैठकीत गंगापूर धरणातून ४२००, दारणा धरणातून ४०० तर मुकणे धरणातून ३०० दशलक्ष घनफूट याप्रमाणे ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण ठेवण्यात आले होते. १५ आॅक्टोबर २०१८ पासून हे आरक्षण देण्यात आले होते. १२ मेपर्यंत म्हणजे २१० दिवसांत महापालिकेने गंगापूर धरणातून ३१४७.९१ दशलक्ष घनफूट तर दारणा धरणातून २४१.४६ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला आहे. अजूनही १५१० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे अर्थात मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेसाठी आरक्षण आॅक्टोबर महिन्यातच मिळाले.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणी