नाशिक : मागील वर्षी १ मे रोजी काढण्यात आलेल्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायत / नगरपरिषदांमध्ये रूपांतर करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतरही स्थानिक तहसीलदारांनी ग्रामपंचायत बरखास्तीची वाट पाहत सूत्रेच न स्वीकारल्याने शासनाला १२ मार्चला याबाबत पुन्हा परिपत्रक काढावे लागले. तरीही ग्रामपंचायत निवडणुकींच्या आडून तहसीलदारांनी अशा ग्रामपंचायतींचा प्रशासक म्हणून कारभार स्वीकारण्यास जिल्'ातील तहसीलदारांनी अनुत्सुकता दाखविल्याचे चित्र असतानाच शेजारील अहमदनगर जिल्'ातील कर्जत तहसीलदारांनी मात्र काल या ग्रामपंचायतींचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. नाशिक जिल्'ातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, देवळा, निफाड व चांदवड या तालुकास्तरावरील मोठ्या ग्रामपंचायतींचे संचालक मंडळ त्यामुळे धोक्यात आले असून, तहसीलदारांना तत्काळ प्रशासक पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिलेले होते. नाशिकमध्ये मात्र अद्याप तहसीलदारांनी प्रशासक म्हणून सूत्रे स्वीकारलेली नाही. प्रत्यक्षात शेजारील नगर जिल्'ातील तहसीलदारांनी प्रशासक म्हणून ग्रामपंचायती बरखास्त करीत त्यांची सूत्रे स्वीकारलेली आहेत. कर्जत ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून स्थानिक तहसीलदार जयसिंग भैसाडे यांनी पदभार स्वीकारला असून, अकोला ग्रामपंचायतींचा प्रशासक म्हणून पदभारही तहसीलदार कैलास पवार लवकरच स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.
नगर तंदुरुस्त, नाशिक मात्र सुस्तच
By admin | Updated: April 4, 2015 01:25 IST