शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:28 IST

नाशिक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्यानंतर नाशिक महानगर भाजपातर्फे वसंतस्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.

ठळक मुद्देशहर भाजपाच्या वतीने जल्लोषनिवडणुकांचे निकाल : फटाके फोडून आनंदोत्सव साजरा

नाशिक : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्यानंतर नाशिक महानगर भाजपातर्फे वसंतस्मृती कार्यालयासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदींचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणला होता.दोन्ही विधानसभा आणि विशेषत: गुजरातचे निकाल काय लागतात याकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी भाजपा कार्यालयात मोठ्या स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली होती. भाजपाच्या बाजूने निकालाचे कल येऊ लागताच पक्ष कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होत होता. भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर जल्लोषाला एकच सुरुवात झाली. भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली आणि गुजरात तसेच हिमाचलच्या मतदारांनी भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकली, असे आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू, ज्येष्ठ नेते विजय साने, जिल्हा अध्यक्ष दादा जाधव आदींचीही यावेळी भाषणे झाली. जल्लोषात विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, सरचिटणीस प्रशांत जाधव, नाना शिलेदार, पवन भगूरकर, उत्तमराव उगले, सुरेश मानकर, दीपाली कुलकर्णी, हिमगौरी आडके, सुनील देसाई, अलका अहिरे, अविनाश पाटील, देवदत्त जोशी ,तुषार जोशी, उदय रत्नपारखी, संपतराव जाधव, स्मिता जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागांत जल्लोष करण्यात आला.देवळालीत भाजपाचा जल्लोष गुजरात व हिमाचल प्रदेश येथील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्याने देवळालीत भाजपाच्या वतीने मिठाई वाटप व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. या यशाचे देवळालीतील रिपाइं नेते विश्वनाथ काळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे, तालुका अध्यक्ष तानाजी करंजकर, नगरसेवक बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, महिला शहराध्यक्ष छाया हाबडे, युवा शहराध्यक्ष संतोष मेढे, विभागप्रमुख सतीश कांडेकर, किरण भागवत, तुषार बोडके, मुस्ताक शेख आदींनी जुन्या बसस्थानक परिसरात पेढे वाटत विजयोत्सव साजरा केला.