शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

सीटू संलग्न कर्मचारी संघटनेची निदर्शने

By admin | Updated: June 21, 2017 01:27 IST

सीटू संलग्न कर्मचारी संघटनेची निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सीटू संलग्न कामगार-कर्मचारी संघटनेने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले.संघटनेच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. वसुधा कराड व माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच सातवा वेतन आयोग लागू करावा, महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाच्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करत त्यावर तातडीने कार्यवाही करावी, सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरावी, अग्निशमन विभागातील अधिकारी-कर्मचारी यांना सुधारित तांत्रिक वेतनश्रेणी लागू करावी, विविध संवर्गातील अधिकारी वर्गाची रिक्त पदे शंभर टक्के पदोन्नतीने भरावी, निवडणूक कालावधीतील जादा कामाचा मोबदला रोखीने अदा करावा, सेवानिवृत्त व वैद्यकीयदृष्ट्या अनफीट सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वाने कामावर घ्यावे यांसह विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जगदीश देशमुख, रावसाहेब रुपवते, संतोष आगलावे, संजय जगताप, अनिल गोसावी, दीपक लांडगे, अजय सौदागर, सुनील राठोड, अजय खळगे, जगदीश अहिरे, संतोष भालेराव, अंबादास खेताडे आदिंसह कर्मचारी सहभागी झाले होते.