शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्यास आव्हान देणार :तिस्ता सेटलवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:07 IST

सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ हा देशाच्या सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वाविरोधी आहे तसेच देशात धार्मिक भेदभावास खतपाणी घालणारा आहे. सुधारित कायद्यात सुस्पष्टता नसल्याने घुसखोरांच्या नावाखाली देशातील मुस्लिमांना लक्ष्य करणारा आहे. याबाबत देशात जनजागृती करीत त्याचा प्रखर विरोध करणार असल्याचे प्रतिपादन मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केले.

ठळक मुद्देभेदभावास खतपाणी घालण्याचा प्रयत्न

मालेगाव मध्य : सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ हा देशाच्या सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वाविरोधी आहे तसेच देशात धार्मिक भेदभावास खतपाणी घालणारा आहे. सुधारित कायद्यात सुस्पष्टता नसल्याने घुसखोरांच्या नावाखाली देशातील मुस्लिमांना लक्ष्य करणारा आहे. याबाबत देशात जनजागृती करीत त्याचा प्रखर विरोध करणार असल्याचे प्रतिपादन मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केले.कम्युनिटी कोआॅर्डिनेशन इनिशिएटिव्ह (सीसीआय) व खातून एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. अब्दुल मजीद सिद्दिकी, खातून एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रिजवान शेख, अ‍ॅड. इरफाना हमदानी उपस्थित होत्या.देशात घुसखोरांची संख्या किती आहे. याची निश्चित आकडेवारी कुठल्याही यंत्रणेकडे नाही. याबाबत सरकारी यंत्रणांमध्ये एकमतनाही.मूठभर नागरिकांसाठी संपूर्ण देशवासीयांना त्यात ओढणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत याबाबत जनजागृती करीत या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे सेटलवाड यांनी शेवटी सांगितले.प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नतिस्ता सेटलवाड म्हणाल्या की, सदर कायद्याने देशात प्रथमच नागरिकांना जातीच्या आधारावर वेगळे करण्याचे काम केले आहे. शेजारील देशातील घुसखोर व शरणार्थी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे ते तिन्ही मुस्लीम देश आहेत. यावरून सरकारची नीती स्पष्ट होते. देशातील अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शिक्षण अशा प्रमुख मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करून जातीय भेदभाव पसरवित सत्ता भोगणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिकPoliticsराजकारण