शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वीज वाहीनीमुळे टाकेद परिसरात नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:05 IST

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

ठळक मुद्देसर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.तीस ते चाळीस वर्षा पुर्वी भंडारदरा येथे तयार केलेली जल विद्युत बोरटेंभा (ईगतपुरी) येथील सब स्टेशनमध्ये वाहून आणण्यासाठी तेहतीस के. व्ही. विद्युत वाहीनी टाकलेली आहे. या वेळी १९८८ ते १९९० च्या दरम्यान परदेशवाडी येथे तालुक्याच्या पुर्व भागासाठी तेहतीस के. व्ही. उपकेंद्र सुरू केले. या उप केंद्रासाठी याच वाहीनीवरून विद्युत पुरवठा करण्यात आला.सदरची वाहीनी वैतारणा वाहीनीसाठी फायद्याची व्हावी म्हणून खंबाळे परीसरातून ही वाहीनी घेण्यात आली. यामुळे कुठेही दोष निर्माण झाल्यास बागायती शेती, दारणा नदीचे विस्तीर्ण पात्र या मुळे रात्री अपरात्री वाहीनीतील दोष काढण्यासाठी खुप त्रास होत असतो. त्यामध्ये जुनाट लोखंडी पोल, जुनाट विजवाहक तारा, खराब झालेले स्टे, चिनमातीच्या चिमण्या ह्या वारंवार खराब होत आहेत. काही तुटत आहेत. यामुळे कायम परदेशवाडी उप केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होत असतो.चार फीडर पैकी टाकेद फिडर वरील विद्युत वाहीनी ही सुमारे सत्तर कि. मी. लांबीची या परिसरात पसरलेली आहे. या फिडरचा लोड ही १९० पर्यंत जात असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त तर असतेच पण या वाहीनीवर ७६ जनित्र आहेत. यामध्ये अधरवड, टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक, अडसरे बुद्रुक व खुर्द व त्यांच्या वाड्या अशा सुमारे वीस गाव व वाड्यांचा समावेश आहे.या सर्व बाबींचा विचार करून टाकेद ते परदेशवाडी ही स्वतंत्र विद्युत वाहीनी टाकण्याची सतत मागणी होत आहे. या मुळे विद्युत दाबाचे नियंत्रण ही होईल. या बाबतचा सात कि. मी. अंतराचा स्वतंत्र वाहीनीचा प्रस्ताव घोटी ग्रामीण विभागाने पाठविल्याचे समजते. याबाबत लोकप्रतिनिधींनी योग्य तो पाठपुरवठा करावा अशी ग्रामस्थ करीत आहेत.