नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेकडून ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून परिसरातील सोसायटी, व्यावसायिक, हॉटेल्स आदी विक्रेत्यांना सूचनापत्र व नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत ओला-सुका कचरा याचे वर्गीकरण न करणाºया १८७ जणांवर मनपाने दंडात्मक कारवाई करून एक लाख ७२ हजाराचा दंड वसूल केला आहे.राज्य शासनाने प्लॅस्टिक, थर्माकोल विक्री व वापर याच्यावर बंदी घातली आहे. कुठल्याच प्रकारचे प्लॅस्टिक, पिशवी व थर्माकोलचा वापर करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. नाशिकरोड परिसरामध्ये मनपा आरोग्य विभागाकडून १९ व्यावसायिकांवर कारवाई करत ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, अनेकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
नागरिकांकडून तीन लाखांचा दंड वसूल कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:42 IST
नाशिकरोड : नाशिकरोड विभागामध्ये गेल्या आठ दिवसांत प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणारे व ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण न करणाºया २०६ जणांकडून जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नागरिकांकडून तीन लाखांचा दंड वसूल कचऱ्याचे वर्गीकरण न करणाºयांवर कारवाई
ठळक मुद्देकचरा वर्गीकरण करूनच घंटागाडीत टाकण्याचे आवाहनकारवाई करून एक लाख ७२ हजाराचा दंड वसूल