शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:37 IST

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी हि संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देलोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उदभव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या का

देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी हि संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे.लोहोणेर येथे गिरणा नदीत असलेल्या उदभव विहीरीवर व कुपनलिकांवर देवळा शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. गिरणा नदीतून हे पाणी सरस्वती वाडी येथील जलकुंभात टाकण्यात येथे व नंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीला चणकापूर व पुनंद धरणातून पाण्याचे आवर्तन सुटते त्या काळात देवळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असतो. पुरंतु गिरणा नदीचे पात्र कोरडे झाले कि शहराचा पाणीपुरवठा ठप्प होतो व शहरात पाणीटंचाई निर्माण होते. गिरणा नदीला पुढचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यावर शहराचा पाणीपुरवठा पुर्ववत सुरू होतो. परंतु या आवर्तनांच्या मधील काळात नगर पंचायतीला शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी यातायात करावी लागते. सरस्वती वाडी येथील पाण्याचा जलकुंभ भरला कि शहरात आळीपाळीने सर्व भागात पाणीपुरवठा केला जातो. यामुळे पाणी सोडण्याच्या वेळ जलकुंभ भरण्यावर अवलंबून असते. सद्या आठ दिवसातून अर्धा तास नळांना पाणी येते. परंतु त्याने शहरातील नागरीकांची गरज भागात नाही व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.नगरपंचायतीने यातून मार्ग काढत टँकर आपल्या दारी हि संकल्पना राबवत सहा टँकरद्वारे शहर व उपनगरात पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रत्येक घरापुढे टँकर उभा करून घरासाठी २०० लिटर पाणी दिले जात आहे. यामुळे टँकरच्या पाण्यासाठी नागरीकांची गर्दी, गोंधळ, तसेच पाण्याची नासाडी होत नाही. ज्या घरापुढे टँकर आला कि त्या घरातील महिलांना शांतपणे पाणी भरता येते. तिसऱ्या दिवशी शहराच्या प्रत्येक भागात पाण्याचा टँकर येत असल्यामुळे नागरीकांना पाणीटंचाईच्या झळा सुसहय होत आहेत. गिरणा नदीला पुढील आवर्तन येईपर्यंत नागरीकांना नगरपंचायतीचे पाण्याचे टँकर मोठा आधार ठरत आहेत.फोटो -देवळा येथे सटाणा रोडवरील एका घरासमोर नगरपंचायतीच्या पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भरतांना त्या घरातील महिला. (१२देवळा टॅँकर)