शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला रस्ते, गटारीच्या कामांना नागरिकांची हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:43 IST

त्र्यंबकेश्वर : येथील गट क्र. २९२ मधील तलाठी कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामे करण्यात आली आहेत. तथापि करण्यात आलेले रस्ते व गटारी या ले आउट प्रमाणे होत नसून अंदाजे गटारी आणि रस्ते केले जात असल्याने या परिसरातील रहिवास्यांनी याबाबत हरकत घेतली असून लेआउट प्रमाणेच रस्ते व्हावे अशी मागणी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील गट क्र. २९२ मधील तलाठी कॉलनी परिसरात रस्ते व गटारींची कामे करण्यात आली आहेत. तथापि करण्यात आलेले रस्ते व गटारी या ले आउट प्रमाणे होत नसून अंदाजे गटारी आणि रस्ते केले जात असल्याने या परिसरातील रहिवास्यांनी याबाबत हरकत घेतली असून लेआउट प्रमाणेच रस्ते व्हावे अशी मागणी नगर परिषदेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत मुख्यधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, निरंजनी आखाड्यासमोरील तलाठी कॉलनी गट नंबर २९२ परिसरामध्ये नगरपरिषदेच्या वतीने सिमेंट काँक्र ीट रस्ते व गटार बांधकाम करण्याचे काम चालू केले आहे. तथापि सुरू असलेले काम हे अंदाजित असून लेआउट प्रमाणे रस्ते होत नाहीत. जेथे जागा मिळेल तेथे रस्ता तयार केला जात आहे.याबाबत या अगोदरही नागरिकांनी लेआउट प्रमाणे रस्ते व्हावेत अशी हरकत घेतली होती. एवढ्यावरच न थांबता नगर परिषदेस निवेदन देखील सादर केले आहे. परंतु नगर परिषदेने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असून पुन्हा एकदा नगर परिषदेला याबाबत निवेदन दिले आहे. सदर रस्ते व गटारी ले आऊट प्रमाणे कराव्यात तसेच या परिसरात पाणी साचत असल्याने रस्त्याच्या ठिकाणी खोदाई करु न काम करावे अशी मागणी होत आहे. (१७ टीबीके १)

टॅग्स :Nashikनाशिक