शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या विद्युत वाहिनीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:13 IST

सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देसटाणा : महावितरण कंपनीचे लाखो रुपये गेले पाण्यात

सटाणा : नामपूर हाउसिंग सोसायटी व बालाजी नगर, राम नगर ते बीएसएनएल ऑफिस भाक्षी रोड येथे लघुदाब व उच्चदाब भूमिगत झालेल्या कामात महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

आरएडीआरपी योजनेत सटाणा शहरात रथ मार्गासाठी उघड्यावरील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी तसेच धोकेदायक पोल व वीज वाहिन्या अपघात होऊ नये म्हणून भूमिगत केबल टाकून उघड्या वीज वाहिन्या काढण्यात येणार आहे. नगर पालिकेने त्यावेळी रथ मार्गावरील रस्ता खोदण्याचा परवाना न दिल्याने भूमिगत वाहिनीचे काम नामपूर हाउसिंग सोसायटी व अभिमन्यू नगर तर उच्चदाब वाहिनी बालाजी नगर, रामनगर पासून बीएसएनएल ऑफिस पर्यंत स्थलांतरित केले.या भूमिगत लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झालेले असून केबल टाकण्याचे काम फेब्रुवारी सन २०१७ मध्ये पूर्ण झाले आहे. तेव्हापासून आजपर्यंत सदर भूमिगत वाहिनी चालूच केली नाही. शासनाने मंजूर केलेली भूमिगत केबलची कामे व त्यासाठी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांचा अपव्यय झाला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.उघड्यावरील जुन्या विद्युत वाहिनी काढून टाकण्यासाठी व जीवित हानी होऊ नये यासाठी भूमिगत केबलचे काम करण्यात आले होते. मात्र अद्यापही जुन्या लघुदाब व उच्चदाब वाहिन्या काढण्यात आलेल्या नसून जुन्याच वाहिनीवरच विद्युत पुरवठा सुरू आहे. जीवित हानी होऊ नये याकरिता टाकण्यात आलेली भूमिगत केबल तशीच पडून आहे.नामपुर हाऊसिंग सोसायटी, अभिमन्यू नगर, बालाजी नगर ते बीएसएनएल ऑफिस पर्यंतच्या नागरिकांनी महावितरण कंपनीचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचा आरोप केला असून जिवीत हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर लघुदाब व उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी चार्ज करुन सुरू करावी व उघड्यावरील विद्युत वाहिन्या काढून टाकाव्यात अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (१० सटाणा २,३)

टॅग्स :electricityवीजtalukaतालुका