शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक भयभीत : जीर्ण जलवाहिन्या बदलण्यास सुरुवात; स्वच्छ पाणीपुरवठ्याची मागणी जुन्या नाशकात रक्तमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:46 IST

नाशिक : जुन्या नाशकातील मोठा राजवाडा भागात रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा झाल्याने नागरिक संतप्तकत्तलखान्याच्या मालकांविरोधात कारवाई

नाशिक : जुन्या नाशकातील मोठा राजवाडा भागात रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तथापि, परिसरातील बेकायदा कत्तलखाने आणि जीर्ण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या जुन्या पाइपमधूनच हे रक्तमिश्रित पाणी येत असल्याचे उघड झाले. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत घटनास्थळी पाहणी केली. यावेळी जीर्ण झालेल्या जलवाहिनी बदलण्याच्या सूचना आमदार फरांदे यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत.मोठा राजवाडा भागात तसेच अन्य काही भागांत रक्तमिश्रित पाणीपुरवठा झाल्याने नागरिक संतप्त झाले. अनेकांनी नगरेसवक आणि अधिकाºयांकडे तक्रारी केल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार फरांदे यांनी घटनास्थळावर धाव घेत नागरिकांशी चर्चा केली. तसेच पालिका अधिकाºयांना घटनास्थळी त्या परिस्थितीशी अवगत केले. पोलिसांनी कत्तलखान्याच्या मालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांना पंचनामा करून, पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा विभागाने तत्काळ जीर्ण जलवाहिन्या बदलण्याची कार्यवाही सुरू केली. यावेळी पूर्व प्रभागाच्या सभापती शाहीन मिर्झा, नगरसेवक शोभाताई साबळे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, निखिल पवार, परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते. या परिसरात अनेक बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असून, त्यातून निघणारे रक्तमिश्रित पाणी हे जुन्या जीर्ण जलवाहिन्यांमधून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे फरांदे यांनी तातडीने या परिसरातील जलवाहिन्या बदलून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच अनधिकृतपणे सुरू असलेले कत्तलखाने बंद करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत.