शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आधार केंद्र बंदमुळे नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:28 IST

अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

नाशिक : अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.  केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला असून, बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, गॅस एजन्सी, आयकर, विक्रीकर आदी खात्यांमध्ये आधार क्रमांकाशिवाय कोणतेही काम शक्य नसल्याने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा नागरिकांची व ज्यांनी यापूर्वी आधारकार्ड काढले परंतु आता त्याचे अपडेशन नसल्याने त्यांना पुन्हा आधार काढण्याची वेळ आली आहे. त्यातच शासनाने आधारकार्ड सेंटर महाआॅनलाइनशी जोडल्यामुळे तर खासगी आधार केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शासनाकडून पुरविण्यात आलेल्या अधिकृत यंत्रावरच आधारकार्डची नोंदणी केली जात असून, नाशिक जिल्ह्याच्या एकूण मागणीचा विचार करता त्यामानाने सुरू केलेली केंद्रे अपुरी पडत आहेत.  गेल्या आठवड्यात आधार केंद्रांबाबत होणारी नागरिकांची ओरड लक्षात घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकाºयांसमवेत बैठक घेऊन नवीन आधार केंद्रे सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या व जिल्हाधिकाºयांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून सोमवारपासून १४ नवीन केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.  खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे मंगळवारी दिवसभर सुरूच होऊ शकली नाही. शनिवार ते सोमवार लागोपाठ तीन दिवस शासकीय सुट्या असल्यामुळे सदरचे आधार केंद्र बंद होते. गेल्या आठवड्यात आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांनी सकाळी ९ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती; परंतु केंद्र सुरूच होऊ शकले नाही. प्रशासनाचा दावा फोल; अनेक केंद्रे बंद असल्याची नागरिकांची तक्रार यूआयडीने सदर केंद्राला सर्व्हिस दिली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले व थोड्या वेळात चालू होईल असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.  सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही केंद्रे सुरू होऊ शकली नाहीत. पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्नही फसल्याने अखेर नागरिकांना माघारी फिरावे लागले.  शहरातील अन्य आधार केंद्रांचीही अशीच अवस्था असून, १७ केंद्रे सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, त्यातील अनेक केंद्रे बंदच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक