शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात आरक्षीत जागेवर बांधकाम करणा-या बिल्डरला नागरीकांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 14:52 IST

नाशिक- महापालिकेच्या आरक्षीत भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेला शॉपींग कॉप्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरीकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसीत करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाला पाठींबा दिला. आणि रस्त्यावर तसेच न्यायालयातही लढाई करण्याची तयारी दर्शवली.शहरातील गंगापूररोडवरील मौजे ...

नाशिक- महापालिकेच्या आरक्षीत भूखंडावर विकासकाकडून सुरू असलेला शॉपींग कॉप्लेक्सचे बांधकाम स्थानिक नागरीकांनी विरोध करीत बंद पाडले. शहरातील आकाशवाणी टॉवरजवळ हे आंदोलन बुधवारी (दि. २२) करण्यात आले. या भूखंडाचे आरक्षण विकसीत करण्यासाठी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने आंदोलनाला पाठींबा दिला. आणि रस्त्यावर तसेच न्यायालयातही लढाई करण्याची तयारी दर्शवली.शहरातील गंगापूररोडवरील मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नं. ७०५ यातील अंतिम भूखंडावर खेळाचे मैदान, क्रिडांगण आणि शॉपींग सेंटरचे आरक्षण आहे. सदरचे आरक्षण ए आर म्हणजेच समावेशक आरक्षणामार्फत विकसीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तथापि, महापालिकेची आरक्षणे विकसीत न करताच बिल्डर्स आपल्या सोयीने शॉपींग कॉम्पलेक्स बांधत आहे. महापालिकेने त्याला खासगी विकासनासाठी रोड फ्रंड जागा देखील स्थलांतरीत करून दिले आहे. तथापि, समावेश आरक्षणामुळे आरक्षणाचा विकास साद्य होत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. समावेशक आरक्षणाव्दारे बिल्डराच्या सोयीने विकास केल्यास क्रीडांगण झाकले जाते तसेच त्यासाठी कमी जागा मिळते. गंगापूररोडवर महापालिकेच्या मालकीचे एकही मोठे क्रिडांगण नसून अशावेळी बिल्डरकडून आरक्षणाचा विकास अडचणीचा ठरणार असल्याने नागरीकांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा घोळ सुरूच असून नागरीकांनी यासंदर्भात फाईली मागण्याचा प्रयत्न केल्यानंतरही महापालिका टाळाटाळ करीत आहे. माहितीच्या आधारे देखील उत्तरे देत नाहीत. त्यातच बिल्डरने शॉपींग कॉम्प्लेक्सचे काम सुरू केल्यानंतर येथील जॉगींग ट्रॅकवर फिरणे कठीण झाले. त्यामुळे बुधवारी (दि. १२) सकाळी नागरीकांनी धरणे आंदोलन सुरू केले. किशोर शिरसाट, संजय खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते तसेच गटनेता विलास शिंदे यांनी देखील येथे भेट देऊन पाठींबा दिला. त्यानंतर नागरीकांनी बिल्डरचे सुरू असलेले बांधकाम बंद पाडले.आंदोलनात आनंदराव बोरसे, पंडितराव बिरारी, राजाराम टर्ले, सतीश मुसळे, मनोज देसले, चंद्राकांत भोई, सुशिला वाडीले, प्रियांका भोई, सविता सांगळे यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.