शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागरे खुनाचा कट कारागृहातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:40 IST

ठक्कर बजारजवळील जाधव खुनातील साक्षीदार रामवाडीतील किशोर नागरे याच्या खुनाचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार व्यंकट मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़

नाशिक : ठक्कर बजारजवळील जाधव खुनातील साक्षीदार रामवाडीतील किशोर नागरे याच्या खुनाचा कट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून रचण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलेला सराईत गुन्हेगार व्यंकट मोरे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली़  किशोर नागरे याचा १० जुलै २०१८ रोजी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली़ या प्रकरणी संशयित शुभम निवृत्ती पांढरे (रा. लोणार लेन), अविनाश उर्फ वामन्या रावसाहेब वाणी आणि एका अल्पवयीनास पोलिसांनी अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत नागरेचा खून हा हल्लेखोरांसोबतचे पूर्ववैमनस्य व व्यंकट मोरेच्या सूचनेवरून झाल्याचे समोर आले़ तसेच या तिघा संशयितांपैकी अल्पवयीन संशयित हा व्यंकट मोरेच्या संपर्कात होता़ कारागृहातील मोरे यास न्यायालयात तारखेसाठी आणल्यानंतर या कटाची माहिती देण्यात आली होती़  पंचवटी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये मोरेला शनिवारी ताब्यात घेतल्यानंतर चार दिवसांची कोठडी मिळाली होती़ याकालावधीत त्याची कसून चौकशी करण्यात आली असून, कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी नागरे खून प्रकरणात व्यंकट मोरेचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आल्याचे सांगितले़ कारागृह अगर न्यायालयादरम्यान संशयितांनी पत्र, चिठ्ठी अगर प्रत्यक्ष संपर्क साधून कटाची कल्पना दिली होती का? याबाबत सखोल तपास सुरू असून, चौकशीत आणखी बाब समोर येणार आहेत़

टॅग्स :jailतुरुंग