देवळाली कॅम्प : परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, या उद्देशाने इनरव्हील क्लबने देवळाली कॅम्पमध्ये १ लाख रुपये किमतीच्या फिरत्या १० कचरा संकलन पेट्या ठिकठिकाणी लावल्या आहेत.या कचरा संकलन पेटीचे उद्घाटन छावणी परिषदेचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सचिन ठाकरे, नगरसेविका आशा गोडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, दीपक बलकवडे, चंद्रकांत गोडसे, विद्या बलकवडे, डॉ. अरुण स्वादी, इनरव्हीलच्या अध्यक्ष मनीषा दोशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज कल्याणकर, स्वच्छता निरीक्षक सतीश भातखळे, राजिंदर ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. कचरा संकलन पेटी लेव्हीट मार्केट, मिठाई स्ट्रीट, जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक आदि ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. यावेळी सुनीता आडके, डॉ. अलका स्वादी, सुरेखा गुप्ता, निवेदिता अथनी, श्रुती मदान, अश्विनी वैद्य, कमलेश वर्मा आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
फिरत्या कचरा संकलन पेट्या
By admin | Updated: May 18, 2016 23:14 IST