शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:09 IST

सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे.

सिडको : सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या रेखांकनाला जागोजागी नागरिकांकडून विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी (दि.२२) रायगड चौकात वाढीव बांधकामांचे मार्किंग सुरू करण्यात आले असता नागरिकांनी अधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालून विरोध दर्शविला. सिडकोच्या पहिल्या योजनेपासून मार्किंग सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन विभागीय अधिकायांना यावेळी देण्यात आले. दरम्यान, बांधकामे हटविल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा नागरिक व महिलांनी दिला.  सिडकोतील वाढीव बांधकामांना मार्किंग करण्यासाठी महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी मंगळवारी दुपारी तानाजी चौकात गेले. तानाजी चौकात सुमारे दोनशे वाढीव बांधकामांना लाल रंगाने रेखांकन करण्यात आले. मात्र, या रेखांकनास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर मनपा अधिकारी व कर्मचारी रायगड चौकात पोहोचले.या चौकातही वाढीव बांधकामांना लाल रंगाने रेखांकन करण्यास सुरु वात असता परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी मनपा विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना नागरिकांनी घेराव घातला.  सदर मार्किंग काम बंद करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जमलेल्या महिला, नागरिकांनी महापालिकेविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर नागरिकांनी  विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन दिले.  मनपाने सिडको योजना क्र मांक एकपासून अतिक्र मण काढावे व योजना एकपासून डिमार्केशन  करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. दरम्यान, सोमवारी शिवपुरी चौकात मोहीम राबविण्यात आली असता, तेथेही नागरिकांनी मार्किंग करण्यास कडाडून विरोध दर्शविला होता.  मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत बांधकामांचे मार्किंग करण्यात येत असून, सिडको व परीसरातील सर्वच ठिकाणांच्या गटारीवरील बांधकामे तसेच रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणे ही पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर उर्वरित अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको