शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

परिमंडळ-२ : अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:41 IST

तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये सुरू आहे.

ठळक मुद्देदेवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणार्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा

नाशिक : शहर आयुक्तालयाच्या परिमंडळ २ मध्ये अवैध धंदे पोलीसांच्या रडारवर आले असून अचानक तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये सुरू आहे.पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अवैध दारूविक्र ी व जुगार अड्डयांवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.२०) सातपूर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी अवैध दारूविक्र ी व जुगार अड्डयांवर छापेमारी केली. इंदिरानगर पोलिसांना जुगार अड्डयांवर छापा टाकत तीनजणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ९३० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित रामचंद्र पुंडलिक गावीत (२७, रा.वडाळा), निसार मोहम्मद शाह (५०, रा.वडाळा), कुंदन खंडू जाधव (३७, रा. भारतनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिकरोड पोलिसांनी अवैध दारूविक्र ी करणारे नाना दामू अहिरे (५२, रा.देवळाली गांव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.सातपूर पोलिसांनी अवैध दारूच्या अड्डयावर छापा टाकत संशयित आरोपी अनिल रामदास चव्हाण (रा.सातपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ८८४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अड्डयावर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या लक्ष्मण शालीक भंगाळे (४८, रा.सातपूर), राजेंद्र अशोक गांगुर्डे (२८,रा.सातपूर), विलास भिला हटक (३८, रा आनंदवल्ली) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला अहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणार्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजेश वसंत पवार (४४, रा.भगूर), सुनील घनशाम जाधव (५०, रा.जेलरोड), ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड (६८, रा.भगूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.लहान मासे गळालापरिमंडळ-२मधील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, सातपूर, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांची कमी नाही; पोलिसांनी अचानकपणे धाडसत्र सुरू केले असले तरी या धाडसत्राच्या प्रारंभी केवळ लहान मासे गळाला लागल्याचे दिसते. मोठे जुगार, क्लब, दारू धंदेचालकांना या कारवाईतून अभय दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक