शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एचपीटी महाविद्यालयात सिनेस्टाइल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:40 IST

एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौतमनगर, अंबड) व राहुल रमेश चव्हाण (१८, रा़ बेथेलनगर, शरणपूररोड, नाशिक) अशी जखमींची नावे आहेत़ या घटनेमुळे महाविद्यालय परिसर व कॉलेजरोडवर सुरू असलेली गुंडागर्दी समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दासमोर आला आहे़

नाशिक : एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौतमनगर, अंबड) व राहुल रमेश चव्हाण (१८, रा़ बेथेलनगर, शरणपूररोड, नाशिक) अशी जखमींची नावे आहेत़ या घटनेमुळे महाविद्यालय परिसर व कॉलेजरोडवर सुरू असलेली गुंडागर्दी समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दासमोर आला आहे़  गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद सुरू झाले़ या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर महाविद्यालयातील काही बाउन्सर्सने मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला़ या दोन्ही गटांना महाविद्यालय प्रशासनासमोर उभे केल्यानंतर समज देण्यात येऊन बाहेर काढले़ यानंतर दोन्ही गटांनी बाहेरच्या टवाळखोरांना बोलावून महाविद्यालय आवारामध्ये दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली़महाविद्यालय आवारात सुरू असलेल्या या वादामध्ये एकही गट माघार घेण्यास तयार नसल्याने बाउन्सर्सने महाविद्यालयाचे सर्व प्रवेशद्वार बंद केले, तर या कालावधीत वादाचे रूपांतर हाणामारीत झाले़  या हाणामारीत टवाळखोरांनी एका तरुणाच्या अंगावर सायकल फेकून जखमी केले़ यानंतर पुन्हा दोन्ही गटांनी एकमेकांवर क्रिकेट बॅट व शस्त्रास्त्राचा वापर करून हाणामारी सुरुवात केली़ यामध्ये प्रशांत खरात या तरुणाच्या डोक्यात बॅट मारल्याने तो गंभीर जखमी झाला, तर दुसºया अन्य घटनेत राहुल चव्हाण हाही जखमी झाला़ या दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ विद्यार्थ्यांमध्ये दहशत सुमारे दोन-अडीच तास महाविद्यालयात सुरू असलेला राडा मिटविण्यासाठी बाउन्सर्सने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर हात उगारला गेला़ गत दोन वर्षांपासून कॉलेजरोड परिसरात धारदार शस्त्रांचा वापर, प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़

टॅग्स :Nashikनाशिकcollegeमहाविद्यालय