शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

रविवार कारंजावर गुंडांची सिनेस्टाइल दहशत

By admin | Updated: January 16, 2017 01:46 IST

एकावर प्राणघातक हल्ला : चौघा संशयितांपैकी एकास अटक

 नाशिक : जुन्या वादाची कुरापत काढण्यासाठी रविवार कारंजा भागात फुलेनगरच्या काही गुंडांनी सिनेस्टाइल पध्दतीने भररस्त्यात उघडपणे धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका जागरूक नागरिकाने त्यांना हटकले असता त्या गुंडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर येथील तीन ते चार गुंड दिंडोरीनाका, रामवाडी, घारपुरे घाटमार्गे रविवार कारंजावर आले. त्यांच्या हातात काही शस्त्रे होती. सदर गुंड दुचाकीवरून जाताना कोयत्यासारखे शस्त्र फिरवित दहशत माजविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास केला. यावेळी रविवार कारंजा येथून जाणारे राजेंद्र लक्ष्मण काशिद यांनी (४७, रा. सीतागुंफा) संबंधितांना कोयता का फिरविता, असे विचारले असता त्यांनी दुचाकीवरून उतरून काशिद यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला; मात्र काशिद यांनी डावा हात बचावासाठी डोक्यावर घेतल्याने कोयत्याचा घाव हाताला लागून ते गंभीर जखमी झाले. हाताला मोठ्या प्रमाणात जखम झाल्याचे बघून गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी काशिद यांना बघून काही नागरिक तेथे आले व त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी काशिद यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविले. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ तपासचक्रेवेगाने फिरवून चौघा संशयितांपैकी फुलेनगर परिसरातून संशयित किरण कोकाटे यास अटक केली आहे. त्याचे सर्व साथीदार फरार असून, त्यांची ओळख पटली आहे. लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. काशिद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी संशयित गुंडांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)