शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिडको-सातपूर परिसर ‘डेंजर झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:15 IST

घराघरांमध्ये साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत असल्याने सिडको-सातपूर परिसर डेंग्यूच्या दृष्टीने ‘डेंजर झोन’ ठरला असून, महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवत डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत.

नाशिक : घराघरांमध्ये साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत असल्याने सिडको-सातपूर परिसर डेंग्यूच्या दृष्टीने ‘डेंजर झोन’ ठरला असून, महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवत डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत.  चार दिवसांपूर्वी सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात ५० हून अधिक डेंग्यूच्या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे महापालिकेच्या पथकांसह जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचाºयांनी सदर परिसरात घरोघरी तपासणी मोहीम हाती घेतली. त्यात ४८२ घरांना भेटी देऊन ५६५ पाण्याचे साठे तपासले असता ११ ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या होत्या. परंतु, रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन महापालिकेच्या पथकाने सोमवारी (दि.३०) मोहीम पुढे चालू ठेवली असता, तुळजाभवानी चौक परिसरातच सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या.  सदर बांधकाम हे दिवाळीच्या सुटीत बंद ठेवण्यात आले होते. परंतु, वरच्या मजल्यावर पाण्याचा ड्रम तसाच पडून होता. याच ड्रममध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांचे उत्पत्तीस्थळ आढळून आले. याशिवाय, एका घराच्या छतावर भंगार मालाच्या ठिकाणी तसेच घरातील माळ्यावर ठेवण्यात आलेल्या सिंटेक्सच्या टाकीत डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. सिडको व सातपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची लागण झालेले रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने महापालिकेने या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. सिडको-सातपूर पाठोपाठ पंचवटी व नाशिकरोड भागात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. फ्रीजच्या ट्रेमध्ये अळ्या महापालिकेच्या पथकामार्फत घरोघरी तपासणी मोहीम राबविली जात असून, त्यात प्रामुख्याने, फ्रीजच्या पाठीमागे असलेल्या ट्रेमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. महापालिकेकडे अपुरा कर्मचारीवर्ग आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन तपासणी करणे शक्य होत नाही. त्यासाठीच नागरिकांनी स्वत:हून साठविलेल्या पाण्याबाबत काळजी घ्यावी आणि डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्यास सदर पाणीसाठे नष्ट करावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.