शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील युवकाचे अपहरण करून खून

By admin | Updated: November 2, 2016 23:22 IST

केवडीबन : भांडणाची कुरापत; मारेकऱ्यांमध्ये पोलीसपुत्राचा समावेश

नाशिक : मागील भांडणाच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्याच एका मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना सोमवारी (दि़ ३१) रात्रीच्या सुमारास केवडीबनातील नवीन शाहीमार्ग परिसरात घडली़ मयूर नरेंद्र देवरे (१९, रा़ खंडेराव चौक, जुने सिडको, नाशिक) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी पाच संशयितांविरोधात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, या खुनामध्ये पोलीस आयुक्तालयातील पोलीसपुत्राचा समावेश असल्याचे समोर आले आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काठेगल्ली परिसरात सोमवारी (दि़ ३१) सायंकाळी सांज पाडवा कार्यक्रमासाठी मयूर देवरे, सर्वेश पवार व त्यांचे मित्रमंडळी जमले होते़ तेथील संशयित अक्षय ऊर्फ बिटू काळोगे, शुभम ऊर्फ नन्नू शर्मा, मयूर शेलार, दीपक ठाकरे व जुनीन सय्यद हे देवरे व पवार या दोघांनाही बळजबरीने म्हसरूळ टेक परिसरातील बंडू वस्ताद तालीम परिसरात घेऊन गेले़ या दोघांशी वाद घातल्यानंतर सर्वेश पवारची दुचाकी व मोबाइल बळजबरीने काढून घेत मयूर देवरेला बळजबरीने दुचाकीवर बसवून तपोवन परिसरात घेऊन गेले़तपोवन परिसरात नेल्यानंतर संशयितांनी मयूरसोबत पुन्हा वाद घालून त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकचा गट्टू मारला तसेच चामडी बेल्टने गळा आवळून त्याचा खून केला व पसार झाले़. याप्रकरणी मयूरचे वडील नरेंद्र उत्तमराव देवरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार संशयितावर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन श्वानपथकाद्वारे संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांचा शोध लागला नसून शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत़दरम्यान, देवरे खून प्रकरणी पोलिसांनी आणखीन काही संशयितांची चौकशी केली़ तसेच या मारेकऱ्यांमधील संशयित अक्षय काळोगेचे वडील पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी आहेत़ (प्रतिनिधी)व्ही़एऩ नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थीसिडकोतील खंडेराव चौकात राहणारा मयूर देवरे हा व्ही़एऩ नाईक महाविद्यालयात चौदावीला होता़ एकुलता एक असलेल्या मयूरच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे़