शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:15 IST

महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या अट्टहासातून स्थापन करण्यात आलेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीनही समित्या केवळ शोभेपुरत्याच उरल्या असल्या तरी, सभापतिपदाचा मान आणि त्यासाठी मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. येत्या २६ एप्रिलला या तीनही विषय समित्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठीही निवडणूक घेण्यात येणार असून, सत्ताधारी भाजपातील सुंदोपसुंदी पाहता आहे ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.

नाशिक : महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या अट्टहासातून स्थापन करण्यात आलेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीनही समित्या केवळ शोभेपुरत्याच उरल्या असल्या तरी, सभापतिपदाचा मान आणि त्यासाठी मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इच्छु कांमध्ये चुरस वाढली आहे. येत्या २६ एप्रिलला या तीनही विषय समित्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठीहीनिवडणूक घेण्यात येणार असून, सत्ताधारी भाजपातील सुंदोपसुंदी पाहता आहे ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे.महापालिकेत सर्वाधिक ६६ नगरसेवक निवडून आणत भाजपाने सत्ता संपादन केली, मात्र सत्तेच्या या खेळात सर्वांना सत्तापदांचा लाभ देण्यासाठी विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीन विषय समित्यांची रचना नव्याने करण्यात आली. मात्र, या समित्या स्थापन करताना त्यांना फारसे आर्थिक अधिकार बहाल न केल्याने तीनही समित्यांची कामगिरी गेल्या वर्षभरात निराशाजनक राहिली. समित्यांच्या सभांनादेखील अधिकारीवर्गाकडून दुय्यम स्थान दिले गेले. शिवाय, प्रशासनाकडून एकही प्रस्ताव समितीवर आणला गेला नाही. समित्यांच्या सभा केवळ चर्चेसाठीच उरल्या. त्यातल्या त्यात, आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनावर अंकुश ठेवत काही प्रमाणात धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातून परिणामकारक असे काहीही घडले नाही. त्यामुळे तीनही समित्या केवळ शोभेच्या ठरल्या.  आता प्रभाग समिती सभापतिपदाबरोबरच विषय समित्यांच्याही सभापतिपदासाठी येत्या २६ एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी २४ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. शहर सुधारणा समितीसाठी वर्षा अनिल भालेराव आणि पूनम सोनवणे यांचे नाव चर्चेत आहे, तर विधी समितीसाठी संगीता गायकवाड, दीपाली कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर आहे. वैद्यकीय व आरोग्य समितीच्या सभापतिपदी पुन्हा एकदा ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे.याशिवाय, रुची कुंभारकर, प्रतिभा पवार हे सुद्धा शर्यतीत आहेत. विषय समित्या या केवळ शोभेपुरता असल्या तरी त्या माध्यमातून नागरिकांमध्ये मिळणारा मान आणि वाहन, दालन या सुविधा पाहता सभापतिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.महिला समितीतही रस्सीखेचमहिला व बालकल्याण समितीतही मागील वर्षाचा काळ संघर्षातच गेला. सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनाही कामकाज चालत नसल्याने आंदोलनात सहभागी होण्याची नामुष्की सहन करावी लागली होती, तर सामूहिक राजीनाम्याचीही तयारी केली गेली होती. आता तर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिला व बालकल्याणसाठी राखीव निधी हा केवळ शासकीय परिपत्रकात समाविष्ट उपक्रमांवरच खर्च करण्याची तयारी दाखविल्याने समितीला स्वत:च्या संकल्पना राबविता येणार नाही. असे असतानाही महिला व बालकल्याण समितीत सभापतिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. प्रामुख्याने, हेमलता कांडेकर आणि सीमा ताजणे यांच्या नावाची चर्चा आहे. अन्य भाजपाच्या सदस्य शीतल माळोदे यांनी विधी समितीचे सभापतिपद, तर कावेरी घुगे यांनी महिला व बालकल्याणचे उपसभापतिपद भूषविले आहे. अर्चना थोरात या गिते समर्थक मानल्या जातात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका