शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडी ठार

By admin | Updated: February 15, 2016 23:33 IST

अंदरसूल : संगमनेर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना

 अंदरसूल : येवला तालुक्यातील सायगाव येथील गणेश मनोहर पतंगराव यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर कणोली (ता. संगमनेर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री ८ वाजता घडली. गुंजन आपल्या आईसोबत दोन दिवसांपूर्वी मामाच्या गावी कणोली, ता. संगमनेर येथे गेली होती. गावाच्या लगतच शेतात मामाचं घर असून, आजूबाजूला उसाची शेती. शुक्र वारी (दि.१२) रात्री ८ वाजता आजोबा भाऊसाहेब वर्पे अंगणात गायीचे दूध काढत होते व गुंजन अंगणामध्ये खेळत होती. अशातच दबक्या पावलांनी येऊन अंगणात खेळणाऱ्या गुंजनची मान पकडून बिबट्या पसार झाला. घरच्यांनी एकच आकांत केला. गावातील तरुणांच्या मदतीने एक तासांच्या शोधमोहिमेनंतर उसाच्या शेतात गुंजनच्या कोवळ्या शरीराचे लचके तोडणारा बिबट्या जमावाला पाहून पसार झाला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गुंजन रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत होती. गुंजनला तत्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गुंजनची प्राणज्योत केव्हाच मावळली होती. रात्री उशिरा १२ वाजता आपल्या गावी सायगाव येथे गुंजनचे शव आणण्यात आले. गुंजनच्या दुर्दैवी निधनाची वार्ता कळताच सायगावकरांसोबत संपूर्ण येवला तालुक्यातील नागरिकांचे हृदय हेलावले. आपल्या बोबड्या बोलाने गावातील शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वेड लावणाऱ्या गुंजनचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. सायगावकरांनी उत्स्फूर्त गावबंद ठेवत गुंजन पतंगराव हिला श्रद्धांजली वाहिली. दिवसभर तालुक्यातील सोशल मीडियातून गुंजनला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी (दि.१३) रोजी सकाळी ९ वाजता सायगाव, ता. येवला मूळगावी गुंजनवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)