शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

गॅस दरवाढीमुळे पुन्हा पेटली चुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:52 IST

देवगाव : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी दिली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखविली आहे.

ठळक मुद्देवाढत जाणारी महागाई चिंतेची बाब

देवगाव : ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांना चुलीवरच्या धुरापासून मुक्ती मिळून पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, यासाठी मोठा गाजावाजा करून केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत घराघरांत मोफत गॅसजोडणी दिली. मात्र, आता गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू बनली असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबाने पुन्हा एकदा चुली पेटवत गॅस सिलिंडरला अडगळीची खोली दाखविली आहे.सुरुवातीला दोन-पाच रुपयांची दरवाढ नंतर पंधरा-वीस रुपयांपर्यंत पोहचली. त्यानंतर पंधरवड्यापूर्वी तर थेट ५० रुपयांची दरवाढ झाली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी या योजनेतून मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. आता दरवाढ करताना या कुटुंबाना गृहीतच धरण्यात आलेले नाही. सुरुवातीला सिलिंडरच्या किमती ४०० रुपयांचा घरात होत्या. आता त्या ८०० रुपयांवर गेल्याने लाभार्थींना महिन्याला एवढी रक्कम आणायची कुठून? असा प्रश्न पडला आहे. गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असल्याने प्रत्येकाचे बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे संकट उभे राहिले आहे.स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत गोवऱ्या व सरपणासाठी फिरावे लागते. महिलांचे हे हाल थांबवून व जंगलांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र, सिलिंडरच्या भाव गगनाला भिडल्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ मिळालेली कुटुंबे आता गॅस महागल्याने पुन्हा चुलीच्या दिशेने वळू लागली आहेत.लाभर्थ्यांचे बजेट कोलमडलेउज्ज्वला योजनेचे बहुसंख्य लाभार्थी हे ग्रामीण भागातील आहे. आर्थिक जनगणनेच्या आधारावर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लाभार्थी कुटुंबाचे महिन्याचे उत्पन्न जेमतेम असते. त्यात घरातील दररोज लागणारा किराणा, भाजीपाला याचा ताळमेळ बसविणे कठीण होत असताना आता गॅस सिलिंडरचे दर कसे परवडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महिन्याला जेमतेम तीन-साडेतीन हजारांची मिळकत असणाऱ्या कुटुंबात सिलिंडरसाठी ८०० रुपये आणायचे कुठून? असा प्रश्न निर्माण होतो आहे.महिनानिहाय गॅस दरवाढडिसेंबर - ५९७ रुपयेजानेवारी - ६९७ रुपयेफेब्रुवारी - ७७२.५० रुपयेमार्च - ९२२ रुपयेउज्ज्वला योजनेतून सिलिंडर मिळाल्याने खूप आनंद झाला होता. मात्र, दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची बाब ठरत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने गॅस वापरणे कठीण झाले आहे. महागडा गॅस परवडत नसल्याने पुन्हा चुलीचा वापर करावा लागत आहे.- योगीता रोकडे, गृहिणी 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक