पिंपळगाव : शहरातील पाराशरी नदीतीरावर विषारी औषध सेवन करत सागर जाधव याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.९) दुपारच्या दरम्यान घडली. मात्र सदर घटना युवकाच्या काकूला समजताच तीचेही हृदयविकाराने निधन झाले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव शहरातील रानमळा शिवारातील हनुमान मंदिर परिसरातील पाराशरी नदी तिरावर सागर माणिक जाधव (२३) रा. मातंगवाडा, पिंपळगाव बसवंत याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.याबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार पंडित वाघ, कॉन्स्टेबल नितीन जाधव आदी तपास करीत आहेत.शोक अनावर झाल्याने चुलतीचे देखील निधनपराशरी नदी काठी विषारी औषध सेवन करून सागर जाधव याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना त्याची चुलती लता विष्णू जाधव यांना कळताच पुतण्याच्या निधनाचा शोक अनावर झाल्याने यांनी काही तासांतच प्राण सोडल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांनी हृदय विकाराने निधन झाल्याचे निदान केले.(फोटो ०९ सागर जाधव)
पुतण्याच्या मृत्यूच्या धक्क्याने चुलतीचे हृदय विकाराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:39 IST
पिंपळगाव : शहरातील पाराशरी नदीतीरावर विषारी औषध सेवन करत सागर जाधव याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.९) दुपारच्या दरम्यान घडली. मात्र सदर घटना युवकाच्या काकूला समजताच तीचेही हृदयविकाराने निधन झाले.
पुतण्याच्या मृत्यूच्या धक्क्याने चुलतीचे हृदय विकाराने निधन
ठळक मुद्देविषारी औषध सेवन करून आत्महत्या