नाशिक : दुचाकीवरून येत महिलांची गळ्यातील पोत खेचण्याच्या घटना शहरात पुन्हा सुरू झाल्या असून, सोमवारी रात्रीच्या सुमारास एक महिलेच्या गळ्यातील पोच खेचून नेल्याची घटना चोपडा लॉन्सजवळ घडली़ पंचवटीतील इंदिरा गांधी दवाखान्याजवळ राहणाऱ्या मीना एकनाथ काळे (४६) या सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चोपडा लॉन्सजवळील रस्त्याने जात होत्या़ त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़ या प्रकरणी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़