शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

खासगी भागीदारीद्वारे घरकुल निर्मितीला पसंती

By admin | Updated: June 6, 2017 03:38 IST

नाशिक : महापालिकेने राबविलेल्या झोपडपट्टीनिहाय व मागणी सर्वेक्षणात ७५ कुटुंब घरकुलांच्या माध्यमातून राहणीमान सुधारण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेने राबविलेल्या झोपडपट्टीनिहाय व मागणी सर्वेक्षणात तब्बल ७५ कुटुंब घरकुलांच्या माध्यमातून आपले राहणीमान सुधारण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आढळून आले आहे. मागणी सर्वेक्षणात तीन घटकांमध्ये २९ हजार ९९१ अर्ज प्राप्त झाले असून, त्यात सर्वाधिक १९,२३८ इच्छुक लाभार्थ्यांनी खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीस पसंती दर्शविली आहे. झोपडपट्टीनिहाय सर्वेक्षणात तब्बल ४४ हजार ७८४ लाभार्थ्यांना घरकुलांची प्रतीक्षा आहे.महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ३१ मे पर्यंत मागणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यात सहाही विभागीय कार्यालयांमार्फत वेगवेगळ्या तीन घटकांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी सहाही विभागातून ७२५३, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी १९ हजार २३८ तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यासाठी अनुदानाकरिता ३ हजार ५०० लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत.