शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

बाबळेश्वरमधील घटना : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:04 IST

नाशिक : तालुक्यातील नाशिक -पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय  चिमुकलीला बिबट्याने ...

ठळक मुद्देअंगणात खेळताना बिबट्याने घातली झडपगुंजन घरातील अन्य मुलांसोबत अंगणात खेळत होती

नाशिक : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील बाभळेश्वर गावातील रहिवाशी राजाराम शिंगाडे यांच्या घराच्या अंगणात खेळणाऱ्या तीन वर्षीय  चिमुकलीला बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेल्याची घटना मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. तासभर गावकऱ्यांनी ऊसशेती पिंजून काढल्यानंतर चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळून आला. गुंजन दशरथ नेहरे (वय 3, रा. पिंंपळगाव ब.) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गुंजन ही आपल्या गर्भवती आईसह बाबळेश्वर या मामाच्या गावी आली होती. रविवारी आईची प्रसूती झाली व नेहेरे कुटुंबियांना कन्यारत्न प्राप्त झाले. आईसाठी दवाखान्यात रात्रीच्या जेवणाचा डबा घेऊन जाण्यासाठी गुंजन वडिलांसोबत शिंदे गावातून बाबळेश्वर येथील मामाच्या घरी आली. जेवण तयार होत असल्याने गुंजन घरातील अन्य लहान मुलांसोबत अंगणात खेळत होती. दरम्यान, घरापासून अगदी जवळच असलेल्या उसाच्या शेतातून बिबट्याने अचानकपणे गुंजनवर झडप घातली आणि अंगणापासून दोनशे ते अडीचशे मीटरपर्यंत गुंजनला फरफटत उसाच्या शेतात नेले असे प्रत्यक्षदर्शी मामा बबन शिंगाडे यांनी सांगितले. दरम्यान, ही घटना लक्षात येताच संपूर्ण बाबळेश्वर परिसरातील लोकवस्तीतील नागरिकांनी ऊसशेती पिंजून काढण्यास सुरुवात केली. चिमुकल्या गुंजनचा ऊसशेतीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिम वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरी, राजेंद्र ठाकरे,उत्तम पाटील यांचे पथक अवघ्या काही वेळेतच घटनास्थळी पोहोचले.त्यांनी गावकऱ्यांना शांत करत बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे आश्वासन दिले दरम्यान,गावकऱ्यांनी बाबळेश्वर गावाच्या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.दोन दिवसांपूर्वीच  दोनवाडे शिवारात बिबट्याने एका वृद्धाला ठार केले होते.ही घटना ताजी असतानाच त्या गावापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटरवर असलेल्या धारणा आणि गोदावरी खोऱ्याच्या बाबळेश्वर गावांमध्ये पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वन विभागाच्या पथकाने मुलीचा मृतदेह तात्काळ ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. या घटनेने शिंगाडे व नेहरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.संपूर्ण गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागFarmerशेतकरीDeathमृत्यू